घरमुंबईएकाच दिवशी भाऊ-बहिणीवर गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी

एकाच दिवशी भाऊ-बहिणीवर गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी

Subscribe

गुडघे प्रत्यारोपणासाठी एका भावाने पाच वर्षे आपल्या बहिणीची वाट पाहिली आणि दोघांनी एकाच दिवशी बोरिवलीच्या अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गुडघा प्रत्यारोपणाची शल्यचिकित्सा करुन घेतली असून ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.

मुंबईतील एका बहीण-भावाने एकमेकांच्या वेदना ओळखून स्वत:साठी नव्हे तर एकमेकांसाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. गुडघे प्रत्यारोपणासाठी एका भावाने पाच वर्षे आपल्या बहिणीची वाट पाहिली आणि दोघांनी एकाच दिवशी बोरिवलीच्या अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गुडघा प्रत्यारोपणाची शल्यचिकित्सा करुन घेतली. जागृती कापडिया (६०) आणि निकुल भोजक (६४) या बहीण-भावाला गुडघेदुखीचा त्रास होता. पण, बहीण शस्त्रक्रिया करत नसल्यामुळे भावानेही शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. त्यानंतर भावाच्या वेदना ओळखून बहिणीने आपली भीती विसरत शस्त्रक्रियेची तयारी दर्शवली आणि बहीण-भावावर एकाच दिवशी गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.

अनेक उपचार करूनही जागृती यांना आराम पडत नसल्यामुळे डॉक्टरांनी गुडघा प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. पण, भीती वाटत असल्यामुळे त्यांनी २०१५ साली ही शल्यचिकित्सा टाळली. जागृती कापडिया यांचे छोटे भाऊ निकुल यांना गेल्या दोन वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास सुरु झाला आणि त्यांनाही डॉक्टरांनी गुडघा प्रत्यारोपणाची गरज असल्याचे सांगितले.

- Advertisement -

गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या १०० रुग्णांपैकी फक्त १० रुग्ण शस्त्रक्रिया करून घेतात. जागृती कापडिया या महिलेनेसुद्धा भीतीमुळे शस्त्रक्रिया करून घेतली नव्हती. फक्त भावाचे दुखणे लक्षात घेऊन ही महिला शस्त्रक्रियेला तयार झाली आणि एकाच दिवशी बहीण आणि भावावर गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.  – डॉ. विविध मकवाना, अपेक्स हॉस्पिटल समूहाचे अस्थीव्यंगतज्ञ आणि शल्यविशारद

निकुल यांच्या पत्नी उषा भोजक यांनी सांगितलं की, ‘‘पाच वर्षांपूर्वी माझ्या नणंदेला गुडघे दुखीचा त्रास व्हायला सुरूवात झाली होती. त्यांना चालताना, बसताना त्रास व्हायचा. डॉक्टरांनी त्यांना प्रत्यारोपण करून घेण्याचा सल्ला दिला होता. पण ९३ किलो वजन असल्याने भीतीमुळे त्या शस्त्रक्रिया करून घेत नव्हत्या”.

- Advertisement -

गुडघे प्रत्यारोपणासाठी रुग्णांची उदासिनता

आजही गुडघे प्रत्यारोपणासंबंधी नेहमीच रुग्ण आण‌ि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात भीती असते. त्यामुळे, गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या १०० रुग्णांपैकी फक्त १० रुग्ण शल्यचिकित्सेसाठी तयार होतात. अनियंत्रित मधुमेह, प्रचंड लठ्ठपणा, ऑस्टिओपोरोसिस, डॉक्टरांकडे जाण्यात केलेली दिरंगाईमुळे अनेकांचे गुडघे बाद होतात आणि अशा नागरिकांना वयाच्या साठीनंतर ५० टक्के अपंगत्व येते. पालथे बसणे, मांडी घालून बसणे, भारतीय पद्धतीच्या शौचालयाचा वापर, चालताना योग्य पद्धतीच्या पादत्राणांचा वापर न करणे, यामुळे गुडघ्याचा वापर अधिक होऊन गुडघ्यांवर वाजवीपेक्षा अधिक ताण येतो आणि अनेक जेष्ठ नागरिकांना हे दुखणे फारच त्रास देते. भारतामध्ये सध्या १८ करोड नागरिक संधीवाताच्या त्रासाला सामोरे जात असून यापैकी ५ करोडहून अधिक नागरिकांना गुडघा प्रत्यारोपण- टीकेआरची गरज आहे. पुरुषांच्या तुलनेत भारतीय महिलांमध्ये ड-जीवनसत्वाची कमतरता असल्यामुळे वयाच्या पन्नाशीमध्येच महिलांना गुडघेदुखीचा त्रास सुरु होतो, असे ही डॉ. मकवाना यांनी स्पष्ट केले आहे.


वाचा – व्ही.एन. देसाई रुग्णालयात होणार गुडघा प्रत्यारोपण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -