घरमुंबईचोरीसाठी जात नाही म्हणून सहकार्‍याची चाकूने भोसकून हत्या

चोरीसाठी जात नाही म्हणून सहकार्‍याची चाकूने भोसकून हत्या

Subscribe

ट्रॉम्बे येथील घटना; आरोपी मित्राला अटक व कोठडी

रेल्वेसह बसमध्ये पाकिटमारीसाठी जात नाही तसेच चोरीचा माल आणून देत नाही या कारणावरुन झालेल्या भांडणातून फकीर मोहम्मद ऊर्फ सर्फराज या 35 वर्षांच्या सहकार्‍याची त्याच्याच मित्राने लाथ्याबुक्यांनी व चाकूने भोसकून हत्या केली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच आरोपी मित्र अन्वरमियाँ शेख याला ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली असून याच गुन्ह्यात त्याला येथील स्थानिक न्यायालयाने 18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश साळवी यांनी सांगितले.

ही घटना सोमवारी सायंकाळी चार वाजता ट्रॉम्बे येथील चित्ता कॅम्प, एच/2 लाईन, बी सेक्टर परिसरात घडली. फकीर आणि अन्वरमियाँ हे दोघेही मित्र असून रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध मुंबईसह पुण्यात चोरी, पाकिटमारी आणि मारामारीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्यांना पुणे पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. याच गुन्ह्यात ते दोघेही जामिनावर बाहेर आले होते. गेले दोन महिने फकीर हा त्याच्या पत्नीसोबत राहत होता. पाकिटमारी तसेच चोरी करण्यासाठी जात नव्हता. तसेच चोरीचा माल आणून देत नव्हता या कारणावरुन फकीर आणि अन्वरमियाँ यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु होता.

- Advertisement -

रागाच्या भरात मारहाण
सोमवारी संध्याकाळी या दोघांमध्ये याच कारणावरुन शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी रागाच्या भरात अन्वरमियाँने फकीरला बेदम मारहाण केली. त्याच्या गुप्तांगावर जोरात लाथ मारली तसेच नंतर चाकूने छातीत खुपसले होते. त्यात फकीर हा गंभीररीत्या जखमी झाला होता. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश साळवी यांच्यासह ट्रॉम्बे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी फकीरला पोलिसांनी तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

पोलीस कोठडी
याप्रकरणी त्याच्या पत्नीच्या जबानीवरुन पोलिसांनी अन्वरमियाँ शेख याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी मित्राला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -