घरमुंबईकोपर उड्डाणपूल २८ ऑगस्टपासून होणार बंद; ऐन गणेशोत्सवात वाहतूक कोंडी

कोपर उड्डाणपूल २८ ऑगस्टपासून होणार बंद; ऐन गणेशोत्सवात वाहतूक कोंडी

Subscribe

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी प्रवासासाठी आधार असलेला कोपर उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.

डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा कोपर रेल्वे उड्डाणपूल येत्या २८ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद होणार आहे. ऐन गणेशोत्सवात डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. एकीकडे कल्याण पत्रीपुलावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असताना आता डोंबिवलीतही वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. मात्र, वाहतूकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक शाखेने पालिकेकडे २० ट्रॅफिक वॉर्डनची मागणी केली आहे.

ठाकुर्ली उड्डाणपूल देखील अपुराच!

कोपर रेल्वे उड्डाणपूल कमकुवत झाल्याने वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. मुंबई आयआयटीने रेल्वेला तसा अहवाल दिला आहे. त्यामुळे या पुलावरील सर्व ट्रॅफिक ही ठाकुर्ली कडील पुलावर वळवली जाणार आहे. मात्र, हा ठाकुर्ली उड्डाणपूल फारसा मोठा नाही. तसेच या पुलाचे कामसुद्धा अर्धवट अवस्थेत आहे. तसेच हा पूल पूर्वेकडे ज्या ठिकाणी उतरतो तेथील रस्ते अरुंद आहेत. त्या ठिकाणी स. व. जोशी शाळा आहे. आधीच त्या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. डोंबिवलीतील रस्ते अरुंद आहेत. त्यातच रिक्षांची वाढलेली संख्या यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणेही मुश्किल असते. त्यातच कोपर पूल बंद झाल्यानंतर शहरात वाहतूक कोंडीचा विळखा बसणार आहे. सणासुदीच्या दिवसात हा निर्णय घेतल्याने डोंबिवलीकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

- Advertisement -

पत्रीपुलावरून वाहतूक? नको रे बाबा!

कल्याणच्या नवीन पत्रीपुलाचे काम संथ गतीने सुरू असून रोजच्या ट्रॅफिक मुळे आणि पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासी आणि नागरिक हैराण झाले आहेत. ‘पत्रीपुलावरून वाहतूक? नको रे बाबा!’ अशी वाहनचालकांची अवस्था झाली आहे. दुसरीकडे नवीन दुर्गाडी पुलाचे बांधकाम ३ वर्षांपासून संथ गतीनेच सुरू आहे. त्यामुळे वाहतूक जुन्या पुलावर चालू असल्याने कल्याण मधून भिवंडी, नाशिक, ठाण्याकडे जायला प्रचंड ट्रॅफिकला तोंड द्यावे लागते. तर कल्याण पूर्वेतील आनंद दिघे पूल छोटा असल्याने पुलावर ट्रॅफिक असते. खड्डे आणि ट्रॅफिकमुळे कल्याण-डोंबिवलीकर नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, सत्ताधारी पक्षातील नेत्यांना नागरिकांच्या त्रासाविषयी काहीच देणे नाही असेच सध्या इथे दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -