घरमुंबईभिवंडीत काँग्रेस उमेदवारा विरोधात कुणबी सेनेचा बंडाचा इशारा

भिवंडीत काँग्रेस उमेदवारा विरोधात कुणबी सेनेचा बंडाचा इशारा

Subscribe

कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी भिवंडी लोकसभेसाठी काँग्रेसने जाहिर केलेला उमेदवार, माजी खासदार सुरेश टावरे यांच्या विरोधात बंडाचा इशारा दिला आहे.

भिवंडी लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाने माजी खासदार सुरेश टावरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करताच काँग्रेसमध्ये अंतर्गत कुरबुरींना सुरवात झाली आहे. सुरेश टावरे यांनी सतत पक्षाशी गद्दारी करत पक्ष विरोधी काम केले असून त्यांना जर पक्ष उमेदवारी देत असेल तर मी अशा गद्दारांचे काम करणार नाही अशी घोषणा कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी पडघा येथे पत्रकारांशी बोलताना केली आहे. कुणबी सेनेच्या वतीने पडघा येथे आपल्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी एका सभेचे आयोजन केले होते, त्याठिकाणी ते बोलत होते. याप्रसंगी भिवंडी, वाडा, शहापूर, मुरबाड येथील कुणबी सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२ मार्चला जाहिर करणार भूमिका

पत्रकारांशी बोलताना त्यांनी कुणबी सेना हि स्वतंत्र असून २०१४ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश करताना मी कुणबी सेनेचे अस्तित्व अबाधित ठेवले होते. काँग्रेस कुणबी सेनेला गृहीत धरुन जर फरफटत नेणार असले, तर ते कदापि सहन केले जाणार नाही असे शेवटी सांगितले .आपण कार्यकर्त्यांना वेट अँड वॉच चा सल्ला दिला असून येत्या २ एप्रिल रोजी आपली भूमिका सभा घेऊन जाहीर करणार असल्याचे सांगितले. या सभेस मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होता.

- Advertisement -

माजी खासदारांना तिकीट

काँग्रेसने काल रात्री उशीरा लोकसभेच्या उमेदवारांची आणखी एक यादी जाहिर केली. या यादीमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश होता. भिवंडीच्या जागेसाठी मोठी रस्सी खेच सुरु होती. शिवसेना ग्रामीण संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे यांना काँग्रेस कडून उमेदवारी दिली जाण्याची चर्चा होती. मात्र पक्षाने माजी खासदार सुरेश टावरे यांना उमेदवार देऊन या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतरगत बंडाळी उफाळून आली आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -