धावत्या ट्रेनमधून पडल्या महिला; थोडक्यात वाचले प्राण

प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे या महिलांचे सुदैवाने प्राण वाचले.

Mumbai
Ladies fall from running train
धावत्या ट्रेनमधून महिला पडल्या

मुंबईमध्ये वारंवार रेल्वे अपघाताच्या घटना घडत असतात. धावत्या ट्रेनमधून उतरु नका, रेल्वे रुळ उलांडू नका अशा रेल्वे प्रशासनाकडून सूचना दिल्या जातात. मात्र तरी देखील नागरिक स्वत:चा जीव धोक्यात घालताना दिसतात. चालत्या ट्रेनमधून उतरताना पडल्याची घटना दादर रेल्वे स्टेशनवर घडली आहे. सीएसटीकडे जाणाऱ्या चालत्या ट्रेनमधून उतरताना दोन महिला प्लॅटफॉर्मवर पडल्या. प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे या महिलांचे सुदैवाने प्राण वाचले. ५ तारखेला ही घटना घडली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here