घरमुंबईपैशाच्या वादातून महिलेची गळा चिरुन हत्या

पैशाच्या वादातून महिलेची गळा चिरुन हत्या

Subscribe

पैशाच्या क्षुल्लक कारणावरुन वांद्रे येथे एका महिलेने दुसऱ्या महिलेची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्चना असे आरोपीचे नाव असून तिला कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पैशाच्या क्षुल्लक कारणावरुन एका महिलेने दुसऱ्या महिलेची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. वांद्रे येथे ही घटना घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी महिला अर्चना हिला पोलिसांनी २४ तासाच्या आत ताब्यात घेतले असून आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

वांद्रे येथील चॅपल रोडवरील लव्हली स्टोरजवळ रविवारी दोन महिलांमध्ये पैशाच्या क्षुल्लक कारणावरुन शाब्दिक भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की या दोघीही एकमेकींच्या अंगावर धावून गेल्या. या दोन्ही महिलांनी एकमेकींना मारहाण करण्यास सुरुवात केली. अखेर आरोपी अर्चना महिलेने जवळील धारदार शस्त्र उचलून समोरच्या महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये महिला खाली कोसळल्यानंतर आरोपींने तिचा धारदार शस्त्राने गळा चिरला. आरोपीने महिलेला रक्ताच्या थारोळ्यात पाहून आरोपींने घटनास्थळावरुन पळ काढला. याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी महिला अर्चना हिच्यावर गुन्हा दाखल करत तिला अटक करण्यात आली असून तिला कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -