चोर करणार होता प्लास्टिक सर्जरी, पण…

भुरट्या चोराला प्लास्टिक सर्जरी आधीच जावे लागले तुरुंगात.

Mumbai
lakhs of rupees jewelry stolen in dindoshi
अटक

भुरट्या चोऱ्या करणाऱ्या समीर मुकर्रम शेख ऊर्फ ‘चिरा’च्या हाती २३ डिसेंबर रोजी घबाड लागल होत. एका रिक्षातून महिलेची बॅग हिसकावत या चोरांने पळ काढला होता आणि या बॅगेत तब्बल १७ तोळे सोन्याचे दागिने सापडल्याने समीरची चांगलीच चांदी झाली होती. तसेच पोलिसांची कायमची नजर चुकवण्यासाठी हा चोर आपल्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करणार होता. लोकांचे कायमचे टोमणे ऐकून तो कंटाळला होता. त्यामुळे त्या सोन्याचे दागिने विकून त्यातील काही पैशातून तो चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करणार होता. मात्र, त्याआधीच त्याला तुरुंगाची हवा खावी लागली आहे. दिंडोशी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विजय जाधव, योगेश कानेरकर आदिंच्या पथकाने त्याला अटक केली आहे.

असा उघडकीस आला गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेंबर रोजी गोरेगाव पश्चिमेतील एस. व्ही. रोड परिसरातून सरिता मोरे रिक्षाने प्रवास करीत होत्या. ओबेरॉय मॉलजवळील सिग्नलवर रिक्षा थांबली असता दुचाकीवरुन येणाऱ्या समीरने बॅग हिसकावत तेथून पळ काढला. याप्रकरणी सरिता यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेत चोराविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही तपासत चोराच्या दुचाकीस्वाराचा माग काढला. त्यानंतर खबऱ्याच्या मदतीने पोलिसांनी मालाड मालवणीतून ‘समीर चिरा’ला गेल्या आठवड्यात अटक केली आहे. तसेच त्याच्याजवळील १७ ऐवजी १४ तोळे सोने सापडले असून उर्वरित सोने साथीदार घेऊन गेल्याची माहिती समीरने पोलिसांना दिली. .

…म्हणून चेहरा बदलण्याचा प्रयत्न

वर्षभरापूर्वी झालेल्या एका हाणामारी दरम्यान, आरोपी समीर शेखच्या चेहऱ्यावर ब्लेडने वार झाला होता. त्याच्या खुणा चेहऱ्यावर पडल्याने त्याला ‘समीर चिरा’ असेच नाव पडले होते. तसेच त्याची याच नावाने हेटाळणी व्हायची. त्याशिवाय छोट्या – मोठ्या गुन्ह्यांमुळे पोलिसांची त्याच्यावर सतत नजर असाची त्यामुळे त्या चोरांने प्लास्टिक सर्जरी करण्याचे ठरवले होते. मात्र, त्याआधीच पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले.


हेही वाचा – वाडिया हॉस्पिटल सुरूच राहणार


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here