घरCORONA UPDATECoronavirus: गर्दीमुळे कल्याणचे लक्ष्मी मार्केट स्थलांतरीत

Coronavirus: गर्दीमुळे कल्याणचे लक्ष्मी मार्केट स्थलांतरीत

Subscribe

करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील लक्ष्मी मार्केटमध्येही भाजी विक्रेते आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने शनिवारपासून लक्ष्मी मार्केट स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील लक्ष्मी मार्केटमध्येही भाजी विक्रेते आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे येथील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने शनिवारपासून लक्ष्मी मार्केट स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील विविध चार परिसरातील मैदानात हा बाजार भरवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कल्याण स्थानकानजीकच्या लक्ष्मी मार्केट येथे दैनंदिन भाजीपाल्याची विविध वाहने राज्यातील वेगवेगळ्या भागातून दैनंदिन शेतमाल, भाजीपाला, फळे, कांदे, बटाटे आणि पालेभाज्या घेऊन येतात. या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शेतमाल सर्व प्रकारचा भाजीपाला घेऊन येणाऱ्या या वाहनांचे नियंत्रण करणे त्याचप्रमाणे तेथे होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण करणे गरजेचे आहे. याकरता कल्याण पश्चिमेतील लक्ष्मी मार्केट हे पुढील आदेश येईपर्यंत स्थलांतरित करण्यात येत आहे. या वाहन धारक व्यापारी यांनी पालिकेने स्थलांतरीत केलेल्या इतर कोणत्याही ठिकाणी वाहने उभी करून भाजीपाला विक्रीकरता येणार नाही. या ठिकाणांव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी लक्ष्मी मार्केटमधील वाहने जाणार नाहीत, याची दक्षता लक्ष्मी मार्केटचे व्यवस्थापक यांची राहणार असल्याचेही पालिकेने सुचित केले आहे.

- Advertisement -

लक्ष्मी मार्केट येथे येणाऱ्या किरकोळ खरेदीदारांनी वरील ४ ठिकाणी किरकोळ खरेदीसाठी जावे. तसेच कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पूर्वीप्रमाणे येणारे सर्व प्रकारच्या शेतमालाची वाहने ही फक्त खाऊक विक्रीसाठी येतील. या ठिकाणी किरकोळ विक्रीस प्रतिबंध करण्यात येत आहे. किरकोळ खरेदीदारांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात यापुढे परवानगी नाही. याबाबतची संपूर्ण जबाबदारी सचिव, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती यांची राहणार आहे. असे आदेश हे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ खाली निर्गमित करण्यात येत असून यात कसूर झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील नियम १० अन्वये आयपीसी कलम १८८ अन्वये फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, असे आदेश महापालिका आयुक्त, डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

येथे भरणार मार्केट

  1.  फडके मैदान, लाल चौकी, आधारवाडी, कल्याण (पश्चिम)
  2. वायलेनगर, कल्याण (पश्चिम) येथील पोतदार शाळेसमोरील खेळाचे मैदान
  3. यशवंतराव चव्हाण क्रिडांगण (मॅक्सी ग्राउंड), संतोषीमाता रोड, कल्याण (पश्चिम)
  4.  कचोरे ठाकुर्ली, ९० फुटी रोड, डोंबिवली पूर्व

घरपोच औषधे उपलब्ध होणार

मेडिकलच्या दुकानांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि पर्यायाने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आवश्यक असणारी औषधे किंवा गोळ्या कल्याण-डोंबिवली केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे आता घरपोच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ठाणे जिल्हा केमिस्ट संघटनेच्या आदेशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी कल्याण आणि डोंबिवलीतील औषध विक्रेत्यांचे नाव तसेच नंबरही असोसिएशनतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांनी दुकानातील गर्दी टाळण्यासाठी केलेल्या आवाहनानुसार ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली पूर्व आणि डोंबिवली पाश्चिमेनुसार मेडिकल्सची वर्गवारी करण्यात आली आहे. ज्या परिसरातून मागणी होईल त्या भागातील विक्रेत्याकडून औषधे उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बघा! करोनाला रोखणारे पोलीस कसा करतायंत प्रवास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -