घरमुंबईटॅक्सीच्या टपावर लागणार दिवे

टॅक्सीच्या टपावर लागणार दिवे

Subscribe

परिवहन विभागाचा निर्णय

विदेशातील टॅक्सी सेवेप्रमाणे आता मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या टपावरही दिवे लावण्यात येणार आहे. यामुळे धावत्या टॅक्सीमध्ये प्रवासी आहेत की नाही याची माहिती प्रवाशांना मिळणार आहे. तसेच टॅक्सीमध्ये प्रवासी नसतानाही टॅक्सीचालक भाडे नाकारत असतील, तर अशा टॅक्सी चालकांवरही चाप बसणार आहे. भारतात पहिल्यांदा असा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

शहरातील रिक्षा-टॅक्सी चालकांनी भाडे नाकारल्यास आरटीओकडून कारवाई करण्यात येते. इतकेच नव्हे तर टॅक्सी आणि रिक्षा चालक घरी जात असताना भाडे स्वीकारत नाहीत. अशा टॅक्सी आणि रिक्षा चालकांवर कारवाई झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अनेक टॅक्सी आणि रिक्षा प्रवासी हात दाखवूनही थांबत नाहीत. त्याच्या तक्रारी प्रवाशांकडून परिवहन विभागाकडे करण्यात येत असतात. प्रवाशांच्या आणि टॅक्सी-रिक्षा चालकांच्या समस्या लक्षात घेऊन टॅक्सी आणि रिक्षा टपावर आता लाल आणि हिरवा दिवा लागणार आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी ही योजना तयार करण्यात आली होती.

- Advertisement -

मात्र काही कारणास्तव त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. नव्या वर्षात या योजनची अंमलबजावणी आता परिवहन विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी परिवहन विभागा तयारीला लागला आहे. आगोदर मुंबईतील टॅक्सी टपावर कोणत्या प्रकारचे दिवे असावेत, त्यांची प्रकाशाची क्षमता किती असावी? यावर परिवहन विभाग अभ्यास करत आहे. लवकरच दिवे तयार करणार्‍या कंपनीबरोबर चर्चा करुन मुंबई उपनगरातील टॅक्सीसाठी दिवे तयार करण्यात येणार आहे. अशी माहिती परिवहन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

700 ते 800 रुपये येणार खर्च
मुंबई उपनगरात टॅक्सींची संख्या सरासरी 45 हजार तर रिक्षाची सरासरी 1 लाख 50 हजार इतकी आहे. शहरात वाढत जात असलेल्या ई टॅक्सी, बेस्टची भाडे कपात तसेच इंधन दरवाढीमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या व्यवसायावर मंदी आली आहे. त्यामुळे टॅक्सी आणि रिक्षाला ही लाईट सिस्टम लावण्यासाठी 700 ते 800 रुपये खर्च येणार आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो, मात्र प्रत्यक्षात हे दिवे लावण्यासाठी परिवहन विभागाने टॅक्सी चालकांना मदत करावी, अशी प्रतिक्रीया ‘आपल महानगर’शी बोलताना स्वाभिमान टॅक्सी रिक्षा युनियनचे अध्यक्ष के.के. तिवारी यांनी दिली.

- Advertisement -

प्रामाणिक टॅक्सी चालकांचे नुकसान
काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या बोनेटवर साधे मीटर होते. मीटर अप असल्यावर टॅक्सी प्रवाशांसाठी उपलब्ध आहे, तर टॅक्सीचा मीटर डाऊन असल्यावर टॅक्सीत प्रवासी आहेत, अशी माहिती मिळायची, मात्र कालांतराने शहरातील सर्व टॅक्सींमध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर लावण्यात आले. हे मीटर टॅक्सीच्या आतमध्ये बसवल्याने बाहेरील प्रवाशाला टॅक्सीची उपलब्धता कळत नाही. याचाच गैरफायदा घेत काही टॅक्सी चालक सर्रासपण भाडे नाकारत होते.

टॅक्सीवर दोन रंगांचे दिवे लावले जातील. त्यातून टॅक्सी प्रवाशांसाठी उपलब्ध आहे का? याची माहिती एका दिव्यातून, तर टॅक्सी उपलब्ध नाही? याची माहिती दुसर्‍या दिव्यातून कळणार आहे. मात्र त्याआधी संबंधित यंत्रणांसह चर्चा करणार आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात बैठक आयोजित केली जाईल. त्यानंतर याच्या अंमलबजावणीला सुरूवात होईल.
– शेखर चन्नेे, आयुक्त, परिवहन विभाग

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -