घरमुंबईरेल्वे तिकिटांचा सर्रास काळाबाजार

रेल्वे तिकिटांचा सर्रास काळाबाजार

Subscribe

रेल्वे तिकीट खिडक्यांबाहेर दलालांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू असल्याचे चित्र सध्या मुंबईत दिसत असून त्यांच्याकडून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी रेल्वेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

उन्हाळ्यातील सुट्यांच्या हंगामात मध्य आणि पश्चिम रेल्वे शेकडो विशेष रेल्वे गाड्या चालवित असते. यात विशेष हॉलिडे स्पशेलही असतात. तरीही सर्वसामान्य प्रवाशांना तिकिटाचे आरक्षण मिळत नाही. कारण चित्रपटगृहांच्या बाहेर होणारा तिकिटांचा काळाबाजार आता रेल्वेच्या कुंपणातही शिरला आहे. रेल्वे तिकीट खिडक्यांबाहेर दलालांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू असल्याचे चित्र सध्या मुंबईत दिसत असून त्यांच्याकडून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी रेल्वेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

विशेष रेल्वे गाड्यांची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचत नाही – प्रवासी

ऐन उन्हाळ्यात आणि सुट्यांच्या मौसमात प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून शेकडो विशेष रेल्वे गाड्या चालविलेल्या जाता. या रेल्वे गाड्यांची माहिती रेल्वे प्रवाशांना मिळावी यासाठी रेल्वेकडून कसल्याही प्रकारची जनजागृती करताना दिसून येत नाही. फक्त वृत्तपत्रात जाहिराती आणि पत्रक काढून माध्यमांना माहिती दिली जाते आणि आपली जबाबदारी संपली, अशी रेल्वेची धारणा तयार झाली आहे. मात्र यांच्या फायदा प्रवाशांना होताना दिसून येत नाही. जेव्हा प्रवासी रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर तिकीट आरक्षित करण्यास जातात, तेव्हा गाड्या हाऊसफुल असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर प्रवासी पर्यायी विशेष गाडीची संबंधित माहिती तिकीट खिडक्यांवर असलेल्या रेल्वे अधिकार्‍यांना विचारल्यास वृत्तपत्र वाचण्याचे फर्मान सोडतात, अशी माहिती रेल्वे प्रवासी सुरेश यादव यांनी दैनिक ‘आपलं महानगर’ला दिली.

- Advertisement -

सीसीटीव्हीची नजर

दलालांमार्फत तिकिटांचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी आरक्षण तिकीट काऊंटरवर सीसीटीव्ही कॅमेरांची नजर राहणे गरजेचे आहे. मात्र रेल्वेकडून यावर लक्ष दिले जात नाही. सोबतच आरक्षण तिकिटांचा काळाबाजार रोखण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांची आहे. मात्र, या खिडकीवर दलालांचा विळखा असताना त्याकडे दुर्लक्ष करत आहे. पोलिसांनी त्याकडे लक्ष देऊन दलालांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

नियमाची अंलबजावणी होत नाही?

काळाबाजार रोखावा म्हणून रेल्वे प्रशासनाने तिकीट काढताना ज्याच्या नावे तिकीट काढायचे आहे, त्याच्या ओळखपत्राची झेरॉक्स घेणे बंधनकारक आह़े, पण, हा नियम रेल्वेचे काही कर्मचारीच धाब्यावर बसवत आहे. त्यामुळे दररोज रेल्वे आरक्षण खिडकीजवळ दिवसा आणि रात्रीच्या वेळी तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल आपली माणसे रांगेत लावून ठेवतात. सकाळी आरक्षण खिडकी सुरू झाली की, पहिले आरक्षणाचे अर्जही या दलालांचेच असतात.

रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या सोडता मात्र यांची माहिती सामान्य प्रवाशांपर्यंत पोहचत नाही. यासंबंधित आम्ही ट्विटरच्या माध्यमातून रेल्वेमंत्री यांना ही समस्या सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर सुद्धा लक्ष दिले जात नाही. त्यामुळे रेल्वेच्या विशेष गाड्या रेल्वे प्रवाशांसाठी कि दलालांसाठी सुरु केल्या आहेत. यासंबंधी रेल्वेने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे,
– सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल परिषद
Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -