घरमनोरंजनलता मंगेशकर रुग्णालयात दाखल

लता मंगेशकर रुग्णालयात दाखल

Subscribe

लतादीदी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना दीड वाजेच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

दिग्गज गायिका लता मंगेशकर यांना श्वास घेण्यासाठी अडचण निर्माण झाल्याने त्यांना सोमवारी पहाटे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ब्रीच कँडी रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार डॉ. फारोख ई उदवडिया (Dr. Farokh E Udwadia) यांच्या मार्गदर्शनाखाली लता मांगेशकर (९०) यांच्यावर उपचार सुरू आहे. ‘लतादीदी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना दीड वाजेच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.’, असे सांगण्यात येत आहे.

लता मंगेशकर यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे देखील  सांगितलं जात आहे. आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, रविवारी लतादीदींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ‘पानिपत’ या चित्रपटामध्ये पद्मिनी कोल्हापुरेंचा लूक शेअर करत या चित्रपटात गोपिका बाईंची भूमिका पद्मिनी कोल्हापुरे साकारत असल्याने त्यांच्यासह संपुर्ण टीमला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.


अखेरच्या श्वासापर्यंत गात राहणार – लता मंगेशकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -