लतादीदींची पुलवामातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना एक कोटींची मदत जाहीर

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी पुलवामा येथे शहीद झालेल्या ४० जवानांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Mumbai
lata mangeshkar
लता मंगेशकर (सौजन्य-डीएनए)

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी पुलवामा येथे शहीद झालेल्या ४० जवानांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही रक्कम लता स्वतःच्या खासगी खात्यातून देण्यार असल्याचे म्हटले जात आहे. लतादीदींचे वडिल मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ७७ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांच्या घोषणेवेळी त्यांचे नातू आदिनाथ मंगेशकर यांनी ही माहिती दिली. त्याव्यतिरीक्त मंगेशकर कुटुंबिय स्वतःच्या वतीने ११ लाख रुपयेदेखील देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यासंबंधीत पत्रकार परिषदेत लता मंगेशकर उपस्थित नव्हत्या. परंतू, त्यांची बहिण उषा मंगेशकर आणि भाऊ हृदयनाथ मंगेशकर यावेळी उपस्थित होते.

मोहन भागवत प्रमुख पाहुणे

पुलवामातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी रक्कम ही भारत सरकारच्या गृहमंत्रालयातील ‘भारत के वीर’ या विभागात सुपूर्द करण्यात येणार आहे. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात सीआरपीएफलाही विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याचा स्विकार सीआरपीएफचे डायरेक्टेड जनरल विजय कुमार करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. हा पुरस्कार सोहळा २४ एप्रिल रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. यावेळी आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यांना पुरस्कार जाहीर

  • लेखक सलीम (जावेद)
  • ज्येष्ठ अभिनेत्री हेलन
  • दिग्दर्शक मधुर भंडारकर
  • शास्त्रीय नृत्यांगना सुचेता भिडे-छापेकर
  • साहित्यिक वसंत वागाजी डहाके
  • भद्रकाली प्रोडक्शन्सचे नाटक ‘सोयरे सकळ’
  • ज्येष्ठ नाटककर्मी मोहन वाघ
  • सामाजिक कार्यकर्ते पंडित सुरेश तळवळकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here