घरमुंबईनिकालाआधीच ‘लॉ’ च्या विद्यार्थ्यांची एटीकेटी परीक्षा!

निकालाआधीच ‘लॉ’ च्या विद्यार्थ्यांची एटीकेटी परीक्षा!

Subscribe

सुमारे चार हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल वेळेवर न लागल्यामुळे लॉ विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. साधारण चार हजार विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन मूल्यांकनाच्या निर्णयामुळे सर्वात मोठा फटका लॉ शाखेच्या विद्यार्थ्यांना बसला. सुमारे चार हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल अजूनही लागलेले नसताना या विद्यार्थ्यांना सोमवारपासून सुरू होणाऱ्या एटीकेटीच्या परीक्षेला बसावे लागणार आहे. परीक्षा व मूल्यमापन विभागाने हा निर्णय घेतला आहे. याविरोधात अनेक विद्यार्थ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून आगमी शैक्षणिक वेळापत्रकावर परिणाम होऊ नये, म्हणून विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. साधारण ४ हजार विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे.

गेल्या वर्षीपासून ऑनलाईन मूल्यांकन

मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षीपासून सरसकट सर्व शाखांच्या उत्तरपत्रिका या ऑनलाइन मूल्यांकनाद्वारे तपासण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठाच्या या निकालामुळे गेल्या वर्षी लाखो विद्यार्थ्यांना निकालाच्या गोंधळाला सामोरे जावे लागले होते. ज्याचा सर्वाधिक फटका लॉ शाखेच्या विद्यार्थ्यांना बसला होता. याच गोंधळामुळे लॉ शाखेच्या अनेक विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले होते. मात्र, या विद्यार्थ्यांच्या पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर न करताच विद्यापीठाने पुढील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यावेळी विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा धारण करत परीक्षा पुढे ढकलण्यास भाग पाडले.

- Advertisement -

निकाल लागायच्या आधीच एटीकेटी!

विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर परीक्षा पुढे ढकलत २५ आणि २६ जूनपासून घेण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यामापन विभागाने घेतला. यादरम्यान निकाल लागेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तरीही हे निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाचा परीक्षा व मूल्यमापन विभाग नापास ठरला. परिणामी सेमिस्टर १, ३ आणि ५ च्या विद्यार्थ्यांना २५ आणि २६ जूनपासून होणाऱ्या एटीकेटीच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळेच विद्यार्थ्यांवर ही वेळ आल्याची टीका विद्यार्थ्यांनी केली आहे.

‘हे तर विद्यापीठाचे अपयश’

‘पुढील शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकाला फटका बसू नये म्हणून परीक्षा विभागाने परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला. पण त्याचा फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीला बसत असल्याचीच खरी शोकांतिका आहे. यासंदर्भात आम्ही सध्याचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांना ईमेलद्वारे निवेदन देखील पाठवले होते. मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा देखील करण्यात आलेला नाही,’ असे स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले.
दरम्यान, परीक्षा विभागातर्फे कोणत्याही परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला नसून सर्व परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील,, असे रविवारी पुन्हा एकदा जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -