घरमुंबईभिवंडी महापालिका अधिकाऱ्यांना इतरत्र पाठवा !

भिवंडी महापालिका अधिकाऱ्यांना इतरत्र पाठवा !

Subscribe

नितिन पंडीत – सरकारी निर्णयाची पायमल्ली करून गेल्या दहा वर्षांपासून जन्म- मृत्यू विभागामध्ये खुर्ची उबवणाऱ्या लिपिकासह ठाण मांडून बसलेल्या सहकर्मचाऱ्यांना अन्यत्र हलवण्यात यावे, अशी मागणी लोकहीत विकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी पालिका आयुक्त मनोहर हिरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे .

लोकहीत प्रतिष्ठानने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की भिवंडी महानगरपालिकेच्या आस्थापनेवर नियुक्ती झाल्यापासून सेवानिवृत्तीपर्यंत काही अधिकारी, कर्मचारी हे शासन निर्णयाची पायमल्ली करून एकाच विभागामध्ये काम करीत आहेत. त्यामुळे त्यांची मक्तेदारी वाढल्याने या कर्मचाऱ्यांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. असाच प्रकार जन्म-मृत्यू विभागामध्ये गेल्या दहा वर्षांपासून लिपिक नारायण तांबे हा कर्मचारी राजकीय आशीर्वादाने एकाच खुर्चीवर ठाण मांडून बसला आहे. या कर्मचाऱ्याची अन्य कोणत्याही विभागामध्ये बदली होत नाही आणि जरी झालीच तरी ती फक्त कागदावर होवून पुन्हा सहीसलामत गुपचुपपणे जन्म मृत्यू विभागामध्येच फिरवली जात आहे. त्यामुळे तांबे हे नागरिकांशी उर्मटपणे वागून माझी बदली होवू शकत नसल्याचे जनतेला आव्हान देत आहे. तांबे यांच्या कार्यशैलीविरोधात नगरसेवक व नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यांची अन्य विभागामध्ये अद्यापी बदली झालेली नाही. तसेच त्यांच्यासोबत काम करणारे सहकर्मचारीही गेल्या अनेक वर्षांपासून त्याच विभागामध्ये तळ ठोकून आहेत.विशेष म्हणजे यातील बहुतांश कर्मचाऱ्यांची मुळ नियुक्ती हि सफाई कामगाराची असून हे कर्मचारी वशिल्याने जन्म मृत्यू विभागात खुर्च्या उबवत आहेत असे तक्रारीत लोकहीत विकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी म्हटले आहे.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -