घरमुंबईमनसेच्या इंजिनला आघाडीचे डबे

मनसेच्या इंजिनला आघाडीचे डबे

Subscribe

ठाणे जिल्ह्यात युतीमध्ये अस्वस्थता

ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत तिसर्‍या क्रमांकावर असलेला आणि लाखांहून अधिक मते मिळवणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आघाडीशी जुळवून घेतल्याने ठाण्यात राजकीय समीकरणे बदलली आहेत. मनसेचे इंजिन लोकसभा निवडणुकीत यार्डातच राहणार असल्याच्या चर्चेने ठाण्यातील युतीच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र मनसेचे इंजिन अचानक यार्डातून आघाडीचे डब्बे जुळवून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला निघाल्याने केवळ ठाण्यातील नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांना मानणारा मराठी मतदार ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. मोदी लाट असतानाही जिल्ह्यातील मनसेच्या तिन्ही उमेदवारांनी लाखांच्यावर मते मिळवली होती. एकंदरीतच आघाडी आणि मनसेच्या गेल्या निवडणुकीतील मिळालेल्या मतांची टक्केवारी एकत्र केल्यास ठाणे लोकसभा निवडणुकीचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व कमी करण्यासाठी मनसेने राष्ट्रवादी व काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करून आघाडीला पाठिंबा जाहीर दिला आहे. यासाठी राज ठाकरे 14 एप्रिलपासून आपल्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. यामध्ये ठाण्यातही एका सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. गुढीपाडव्याला मुंबईत केलेल्या सभेची जोरदार चर्चा तसेच सभेला झालेली गर्दी यामुळे मनसे दखलपात्र ठरली आहे. त्यातच व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेची ठाण्याच्या राजकीय वर्तुळात देखील चांगलीच चर्चा रंगली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -