घरमुंबईलेप्टोचा वाढता प्रभाव, मुंबईत सहावा बळी !

लेप्टोचा वाढता प्रभाव, मुंबईत सहावा बळी !

Subscribe

मुंबईकरांनो पावसाळ्यात सावधान ! शहरात लेप्टोस्पायरोसिसचा प्रभाव वाढतो आहे.

मुंबई शहरात सध्या लेप्टोस्पायरोसिसचा वाढता प्रभाव आहे. नुकताच लेप्टोमुळे मुंबईत सहावा बळी गेल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील भांडुप पूर्व विभागात राहणारा सिद्धेश माणगावकर या २७ वर्षीय तरुणाचा लेप्टोस्पायरोसिसमुळे शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. सिद्धेश हा पेशाने इंजिनिअर होता. १३ जुलैला संध्याकाळी कामावरुन परतताना त्याला अस्वस्थ वाटू लागलं. यानंतर त्याच्या आई – वडिलांनी तातडीने मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात त्याला दाखल केलं. रुग्णालयात दाखल करतेवेळीच तो बेशुद्धावस्थेतच होता. फोर्टिस रुग्णालयात उपचार घेताना सिद्धेशच्या फुफुस, मूत्रपिंड आणि अन्य अवयव निकामी होत गेले. काही दिवसानंतर सिद्धेशने औषधांना प्रतिसाद देणंही बंद केलं होतं. आमच्याकडून रुग्णाला वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केला जात असून रुग्ण कोणत्याही उपचाराला प्रतिसाद देत नाहीये’, अशी माहिती मुलुंड फोर्टिस रुग्णालयातील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली होती. मृत्यूशी आठ दिवस झुंज केल्यानंतर अखेर शुक्रवारी सिद्धेशची प्राणज्योत मालवली. त्याच्या मागे आई-वडील आणि लहान बहीण असं कुटुंब आहे. सिद्धेश गेल्याने त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. मुंबईमध्ये कुर्ला, गोवंडी, माहीम, वरळी, सायन आणि भांडुप येथील सहा जणांचा लेप्टोमुळे मृत्यू झाला आहे.

लेप्टोस्पायरोसिसची लक्षणं

या रोगाचा प्रसार पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात होतो. या दिवसात सर्वत्र चिखल आणि पाण्याची डबकी तयार होतात. त्यामध्ये लेप्टोचे जीवाणू तयार होतात. त्याचबरोबर उंदीर, गाय, म्हैस, घोडा, मांजर, कुत्रा या प्राण्यांच्या विष्ठेतून आणि मुत्रातून लेप्टोस्पायरोसिस रोगाचा प्रसार होतो. या प्राण्यांच्या मुत्रातून बाधित जीवाणू पाणी आणि मातीत बरेच दिवस टिकून राहतात. हे मातीत किंवा पाण्यात असलेले जीवाणू व्यक्तींच्या पायाला असलेल्या छिद्रातून शरीरात प्रवेश करतात आणि त्या व्यक्तीला लेप्टोस्पायरोसिस हा रोग होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -