घरमुंबईजेलमध्ये जाण्याची इच्छा पूर्ण करू

जेलमध्ये जाण्याची इच्छा पूर्ण करू

Subscribe

ज्यांची जेलमध्ये जायची इच्छा आहे, त्यांना तथास्तु म्हणत लवकरच ती इच्छा पूर्ण केली जाईल, असा इशारा सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकुर यांना अप्रत्यक्षरित्या दिल्याने खळबळ उडाली आहे.

विरारमध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यासाठी विजय संकल्प सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. सभेला एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे, आमदार रविंद्र फाटक, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार पास्कल धनारे, विवेक पंडीत यांच्यासह सेना-भाजपचे हजारो पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

या सभेत आमदार हितेंद्र ठाकुर आणि बहुजन विकास आघाडीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली. तर आम्ही ईडीला सीबीआयला घाबरत नाही. जेलमध्ये जायला तयार आहोत, अशा वक्तव्याचा हितेंद्र ठाकुर यांचा व्हिडीयो वायरल झाल्याचे सांगून त्यांच्या पालिकेतील 122 कोटींचा घोटाळ्याची एसआयटीकडून चौकशी करा आणि त्यांची जेलमध्ये जाण्याची इच्छा पूर्ण करा.अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी भरसभेत मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर ज्यांची जेलमध्ये जाण्याची इच्छा आहे. त्यांना तथास्तु म्हणत ती लवकरच पूर्ण केली जाईल.

खूप लोक जेलमध्ये जाण्याच्या रांगेत आहेत. त्यात तुमचा नंबर लागल्यावर नक्कीच तिथे पाठवले जाईल, असा इशारा अप्रत्यक्षपणे फडणवीस यांनी हितेंद्र ठाकुर यांना दिला. वसई तालुक्यात बांधकाम करण्यासाठी आणि पाण्यासाठी ‘झेड. झेड.’ फंडाच्या नावाखाली सत्ताधारी नागरिकांकडून पैसे उकळत आहेत, अशी माहिती मिळाली आहे. या फंडाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येईल आणि ‘झोलझाल’ फंड घेणार्‍यांची पोलखोल करण्यात येईल.निवडणुकीनंतर वसईतील पाण्याचे कनेक्शन ऑनलाईन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी करून टाकली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -