घरमुंबईमतदारांना आमिष ; गुजरात आघाडीवर

मतदारांना आमिष ; गुजरात आघाडीवर

Subscribe

2464.2 कोटी किमतीच्या वस्तू जप्त

निवडणुकीदरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून विविध क्लुप्तीचा वापर करण्यात येतो. यामध्ये मतदारांना पैसे वाटपापासून दारु पुरवण्यापर्यंत अनेक गैरमार्गांचा वापर केला जातो. राज्य पोलिसांकडून आचारसंहिता जाहीर झाल्यापासून केलेल्या कारवाईमध्ये संपुर्ण देशातून आतापर्यंत 2464.2 कोटी किमतीची दारु, पैसे, दागदागिने, विविध भेटवस्तू जप्त केल्या आहेत. यामध्ये गुजरातमधून सर्वाधिक 514 कोटी किमतीच्या वस्तू जप्त केल्या आहेत. त्याखालोखाल तामिळनाडू, दिल्ली व आंध्र प्रदेश क्रमांक लागतो.

निवडणुकीमध्ये जिंकून येण्यासाठी उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारची आमिषे दाखवत असतात. यामध्ये अनेकदा मतदारांना पैसे वाटप करण्याबरोबरच त्यांना दारु व अन्य अमली पदार्थांचाही पुरवठा केला जातो. तसेच महिला वर्गाला आकर्षित करण्यासाठी दागिने व घरगुती वस्तू भेट दिल्या जातात. याचा परिणाम मतदानावर होतो. उमेदवारांकडून वापरण्यात येनारया गैरमार्गाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाकडून पोलिसांच्या मदतीने कायदेशीर कारवाई करण्यात येत असते. देशात आचारसहिता लागू झाल्यापासून निवडणूक आयोगाने राज्य पोलिसांच्या मदतीने विविध ठिकाणी कारवाया करत आहे.

- Advertisement -

यामध्ये आतापर्यंत देशातून 2464.2 कोटी किमतीची दारु, पैसे, दागदागिने, विविध भेटवस्तू जप्त केल्या आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पूर्वी विकासाचे वारे आणलेले गुजरात राज्य आघाडीवर आहे. गुजरातमधून तब्बल 515.94 कोटी किमतीच्या वस्तू जप्त केल्या आहेत. त्याखालोखल तामिळनाडूमधून 475.95 कोटी, दिल्लीमधून 389.01 कोटी, आंध्र प्रदेश 216.16 कोटीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर असून 107. 96 कोटीच्या किमतीची दारु, अमली पदार्थ, पैसे, दागिने, भेटवस्तू जप्त केले आहेत. तर सिक्किम 28 लाख, चन्दिगद 20 लाख, पुद्दुचेरी 45 लाख जम्मू काश्मिर 57 लाख किमतीच्या वस्तू जप्त केल्या आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक दारू जप्त
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून सर्वाधिक 25.54 लाख लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेशमध्ये 14.25 लाख व पश्चिम बंगालमध्ये 10.45 लाख लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

अमली पदार्थाचा वापर सर्वाधिक
जप्त केलेल्या मालामध्ये तब्बल 1097.47 कोटी किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक 500 कोटी किमतीचे तर दिल्लीमध्ये 348.72 कोटीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. अमली पदार्थाच्या सेवनासाठी बदनाम असलेल्या पंजाब तिसर्‍या क्रमाकांवर असून पंजाबमधून 148.95 कोटीचे अमली पदार्थ जप्त केले.

तामिळनाडूमध्ये सर्वाधिक सोने जप्त
उमेदवारांकडून मतदारांना पैसे, सोने व चांदीचे दागिने वाटप करण्यामध्ये तामिळनाडू आघाडीवर आहे. तामिळनाडूमधून सर्वाधिक 1601 किलोचे 284.13 कोटी किमतीचे दागिने तर 181.08 कोटीची सर्वाधिक रोख जप्त केली आहे. तसेच आंध्र प्रदेशमधून 137.07 कोटीची रोख जप्त केली आहे.

राज्य जप्त मालाची किमत (कोटीमध्ये)
गुजरात – 515.94
तामिळनाडू – 475.95
दिल्ली – 389.01
आंध्र प्रदेश – 216.16
पंजाब – 194.26
उत्तर प्रदेश – 161.49
महाराष्ट्र – 107.96

जप्त रोकड – 628.54 कोटी
जप्त दारु – 204.48 कोटी
जप्त अमली पदार्थ – 1097.47 कोटी
जप्त मौल्यवान वस्तू – 490.38 कोटी
जप्त भेटवस्तू – 43.33 कोटी
एकूण – 2464.2 कोटी

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -