घरमुंबईभाजपाच्या ४१ स्टार प्रचारकांची यादी तयार; मोदी-शहांच्याही सभांचा धडाका

भाजपाच्या ४१ स्टार प्रचारकांची यादी तयार; मोदी-शहांच्याही सभांचा धडाका

Subscribe

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली असून, राज्यात भाजपाच्या सभांचा धडाका असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाचे केंद्रातील तसेच इतर ज्येष्ठ नेत्यांच्या देखील सभा आयोजित करण्यात आल्या असून, या स्टार प्रचारकामध्ये ४१ जणांचा समावेश असणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली असून, राज्यात भाजपाच्या सभांचा धडाका असणार आहे. रविवारी कोल्हापूरमध्ये युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांवर जोरदार टीका करणार आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोल्हापूरच्या सभेनंतर राज्यात सर्वत्र महायुतीच्या प्रचाराच्या सभांचा धडाका सुरू होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाचे केंद्रातील तसेच इतर ज्येष्ठ नेत्यांच्या देखील सभा आयोजित करण्यात आल्या असून, या स्टार प्रचारकामध्ये ४१ जणांचा समावेश असणार आहे. अजून सभांच्या तारखा निश्चित झाल्या नसल्या तरी या ४१ स्टार प्रचारकांची यादी भाजपाने तयार केली आहे.

नाराजांचाही यादीत समावेश

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भाजपामध्ये सध्या असूनही नसल्यासारख्या नेत्यांचाही या स्टार प्रचारकाच्या यादीत समावेश आहे. यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी तसेच एकनाथ खडसे यांचाही समावेश करण्यात आला आहे. गांधीनगरमधून लालकृष्ण अडवाणी यांच्याऐवजी अमित शहा यांना उमेदवारी देण्यात आली असली तरी राज्यातील या स्टार प्रचारकाच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

उत्तर भारतीयांच्या मतांसाठी मुंबईत योगी

मुंबईमध्ये जसे मराठी मतदारांचे प्रमाण जास्त आहे तसेच उत्तर भारतीय मतदारांचे देखील प्रमाण आहे. त्यामुळे या उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या देखील सभा होणार आहेत.

हे आहेत भाजपाचे स्टार प्रचारक

४१ जणांच्या या यादीत नरेंद्र मोदी, अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंग, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, योगी आदित्यनाथ, शहानवाज हुसेन, पियुष गोयल, शिवराज सिंग चौहान, मुक्तार अब्बास नक्वी, मुरली मनोहर जोशी या केंद्रातील दिगगज नेत्यांचा समावेश असणार आहे. तसेच राज्यातील देखील नेत्यांचा या यादीत समावेश असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -