घरमुंबईएलएलआयएन रसायनी प्रकल्प आरोग्याच्या दृष्टिने महत्वाचा

एलएलआयएन रसायनी प्रकल्प आरोग्याच्या दृष्टिने महत्वाचा

Subscribe

केंद्रीय रसायन मंत्री डी. बी. सदानंद गौडा यांचे प्रतिपादन

देशातील नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात सरकार जागृत असून एलएलआयएन रसायनी प्रकल्प आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा प्रकल्प ठरेल, असा विश्वास केंद्रीय रसायन मंत्री डी. बी. सदानंद गौडा यांनी गुरुवारी रसायनी येथे केले. रसायनी स्थित हिल (एचआयएल) इंडिया लिमिटेड कंपनीत मच्छर नष्ट करण्याचे अद्यावत मच्छरदाणी तयार करण्याचा अर्थात एलएलआयएन प्रकल्प उभारण्यात येणार असून या प्रकल्पाचे भूमीपूजन गौडा यांच्या हस्ते झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी धोरणे तयार केली व त्याची यशस्वी अंमलबजावणीही केली असल्याचे गौडा यांनी यावेळी नमूद केले. यावेळी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात या उपक्रमाचे कौतुक करत हा प्रकल्प या कंपनीसाठी आणि औद्योगिक वसाहतीसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याचे म्हटले. त्याचबरोबरीने येथील कामगारांच्या वेतनाचा प्रश्नही त्यांनी मांडून याकडे केंद्राने विशेष लक्ष देण्याची मागणीही यावेळी केली.मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, जिका, जपानी एनकेफलायटीस आणि फिलेरिया यासारख्या मच्छरपासून फैलाव होणार्‍या आजाराना रोखण्यासाठी हा प्रकल्प मोलाची भूमिका बजावणार आहे.

- Advertisement -

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रसायन व खते स्थायी समिती अध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ, खासदार श्रीरंग बारणे, सिडकोचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर,युनिडोचे डॉ. रेनेवॅन बेरकेल, केंद्रीय रसायन विभागाचे सचिव पी. राघवेंद्र राव, हिल इंडियाचे सीएमडी एस. पी. मोहंती तसेच अधिकारी, परिसरातील लोकप्रतिनिधी, कामगार आणि नागरिक उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -