घरमुंबईशेकडो प्रवाशांसह लोकल कारशेडमध्ये

शेकडो प्रवाशांसह लोकल कारशेडमध्ये

Subscribe

वाशी स्थानकात घडला प्रकार

रेल्वेतील उद्घोषणेतील चुकीमुळे रेल्वेप्रवासी ठाणे ऐवजी सानपाडा कारशेडला पोहचल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. कारशेडला जाणारी लोकल वाशी स्थानकात थांबलेली असताना ती ठाण्याला जाणारी लोकल असल्याची चुकीची उद्घोषणा झाली. त्यामुळे प्रवासी त्यात बसले. मात्र ही लोकल थेट सानपाडा कारशेडकडे निघाल्यावर प्रवाशांनी गोंधळ केला.

मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वाशी रेल्वेस्थानकात हा प्रकार घडला. कारशेडला जाणारी लोकल उभी असताना रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळे ती लोकल ठाण्याला जाणारी असल्याची घोषणा झाली. त्यामुळे ठाण्याला जाणारे प्रवासी त्या लोकलमध्ये बसले होते. मात्र काही वेळातच ही लोकल ठाणेला जाणार्‍या ट्रॅकऐवजी कारशेडला जाणार्‍या ट्रॅकवर चालू लागली. हा प्रकार प्रवाशांच्या निदर्शनास येईपर्यंत लोकल सानपाडा कारशेडमध्ये पोहचली होती.

- Advertisement -

अखेर लोकल ठाणे ऐवजी कारशेडला पोहोचल्याने फसगत झालेल्या रेल्वे प्रवाशांना कारशेडमधून पायी सानपाडा अथवा वाशी स्थानकाकडे यावे लागले. या प्रकारचा रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून चुकीची उद्घोषणा झाल्याने झालेल्या त्रासाबद्दल प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच संबंधितांवर कारवाई करण्याचीही मागणी केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -