घरमुंबईबदलापूरकरांना प्रतिक्षा 15 डब्यांच्या लोकलगाड्यांची

बदलापूरकरांना प्रतिक्षा 15 डब्यांच्या लोकलगाड्यांची

Subscribe

बदलापूरमध्ये वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत लोकल गाड्या कमी आहेत. त्यामुळे लोकल गाड्या वाढवण्याबरोबरच 15 डब्यांच्या लोकल सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होऊ लागली आहे.

बदलापूरची लोकसंख्या गेल्या दोन अडीच दशकांत झपाट्याने वाढली आहे. बदलापुरातील बहुतांश नागरिक चाकरमानी वर्गातील असून नोकरी व्यवसायानिमित्त त्यांना दररोज मुंबई वा मुंबईतील उपनगरात यावे जावे लागते. लोकलशिवाय दुसरा जलद आणि स्वस्त असा पर्याय नाही. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी प्रवासी संख्या नाही. बदलापूर रेल्वे स्थानकात अनेक सोयीसुविधांची कमतरता आहे. या पार्श्वभूमीवर लोकराज संघटनेच्या बदलापूर कमिटीच्या वतीने रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांसंदर्भात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

- Advertisement -

4 हजारहून अधिक प्रवाशांनी स्वाक्षरी देऊन या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे. या मागण्यांसंदर्भातले निवेदन २ फेब्रुवारी रोजी बदलापूर रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्टरांना सादर करण्यात आले. तसेच ४ फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेचे डीआरएम यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांनाही हे निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे दिनेश पाल यांनी दिली आहे.

काय आहेत मागण्या?
बदलापूर ते सीएसटी दरम्यान अप व डाऊन मार्गावर लोकल गाड्यांची संख्या वाढवण्यात यावी, लोकलमध्ये महिला डब्यांची संख्या वाढवण्यात यावी, बदलापूरसाठी महिला स्पेशल लोकल सुरु करण्यात यावी, प्रत्येक लोकलमध्ये 15 डबे असावेत, प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी, प्लॅटफॉर्मवरील अर्धवट शेड पूर्ण करण्यात यावी तसेच रेल्वे स्थानकातील पादचारी पुलांची संख्या वाढवण्यात यावी, आदी मागण्या रेल्वे प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -