CoronaVirus- ‘घराबाहेर जाऊ नकोस’ असं सांगितलं म्हणून केली भावाची हत्या!

Mumbai

करोनाच्या वाढत्या धोक्यामुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे ‘लोकांनी घरीच थांबा, बाहेर जाऊ नका’ असे आवाहन करण्यात आले आहे. पण तरीही नागरिक घराबाहोर पडताना दिसतात. घराबाहेर पडू नका हाच सल्ला देणं मुंबईत एका तरूणाला महागात पडलं आहे. करोनामुळे बाहेर जाऊ नका असं सांगितल्यामुळे भावानेच भावाची हत्या केली आहे.

मुंबईतल्या कांदिवली पूर्वकडील पोइसरमध्ये काल दुपारी ही धक्कादायक घटना घडली. पत्नीसोबत घराबाहेर जाण्यास आक्षेप घेतल्याने चिडलेल्या भावाने धाकट्या भावाचीच हत्या केली. कोरोनाच्या भीतीने पुण्याला राहणारा दुर्गेश ठाकूर मोठ्या भावाच्या घरी राहायला आला. यावेळी २८ वर्षीय आरोपी राजेश ठाकूर पत्नीसोबत खरेदी करण्यासाठी बाहेर निघाला होता. मात्र करोनाचा संसर्ग होण्याची भीती आणि लॉकडाऊन तसेच संचारबंदी असल्यामुळे घराबाहेर जाऊ नका सल्ला धाकटा भाऊ दुर्गेश ठाकूरने दिला.

बाहेर जाऊन आल्यानंतर मोठ्या भावाचा संताप अनावर झाला. त्यावरुन दोघा भावंडांमध्ये चांगलाच वाद झाला. मात्र हा वाद इतका विकोपाला गेला, की राजेशने सुरी खुपसून आपल्या धाकट्या भावाचा जीवच घेतला. समता नगर पोलिसांनी आरोपी राजेश ठाकूरला अटक केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here