घरमुंबईLockDown: अडकलेल्या कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी लालपरी थेट त्यांच्या गावात

LockDown: अडकलेल्या कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी लालपरी थेट त्यांच्या गावात

Subscribe

एसटी महामंडळाकडून लांब पल्याचा विशेष गाड्या सोमावरपासून सुरु करण्यात आल्या आहेत. पालघर ते शिरपूर, शहादा ते पालघर, नंदुरबार ते पालघर आणि नाशिक नंदुरबार धुळे जळगाव , कोल्हापूर, रत्नागिरी बसेस सुरु

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यस्था बंद असून फक्त अत्यावश्यक सेवेत काम कर्मचाऱ्यांसाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथील एसटीच्या ६०० बसेस नियोजन करण्यात आले होते. मात्र या लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळातील काम करणारे बहुतांश कर्मचारी स्वतःच्या गावी आहेत. गावातून मुंबईत यायला कोणतीही साधनं नसल्याने अत्यावश्‍यक सेवेतील फक्त ३० टक्के कर्मचारी हजर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गैरहजर कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा एसटी महामंडळाने दिला होता. मात्र कर्मचारी गावात अडकल्याची माहिती मिळताच एसटी महामंडळाकडून लांब पल्याचा विशेष गाड्या सोमवारपासून सुरु करण्यात आल्या आहेत.

महामंडळाकडून लांब पल्याचा विशेष गाड्यांची सोय

कोरोना विषाणूमुळे अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातून कामावर हजर होण्यासाठी तसेच त्यांनतर पुन्हा घरी जाण्यासाठी एसटी महामंडळाच्यावतीने ६०० बसेस अत्यावश्यक सेवा म्हणून चालवण्याचे नियोजनही करण्यात आले होते. मात्र या लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळातील काम करणारे बहुतांश कर्मचारी स्वतःच्या गावी असल्याने गावातून मुंबईत यायला कोणता पर्याय नसल्याने ते कामावर रूजू होऊ शकत नव्हते. त्यातच कर्तव्यावर गैरहजर असल्यास निलंबित करण्याची कारवाई करण्याचे आदेश एसटी महामंडळाकडून देण्यात आले होते. तरी सुद्धा कर्मचारी कामावर उपस्थिती झाले नाही.

मुंबई, ठाणे आणि पालघर विभागाचे कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आदेश दिल्यानंतर बहुतेक एसटी कर्मचारी हजर झाले आहेत. मात्र काही कर्मचारी गाव खेड्यात अडकले आहे. त्यामुळे परिस्थिती लक्षात घेतात आम्ही त्यांच्यासाठी कोल्हापूर, नंदुरबार, रत्नागिरी सारख्या विभागातून काही विशेष बसेस सोडण्यात आले आहे.
-राहुल तोरो, महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ

- Advertisement -

नियोजन केलेल्यांपैकी मोजके कर्मचारी कामावर येत आहेत. शनिवारी ५० टक्के कर्मचारी कामावर गैरहजर हजर असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे बसगाड्यांच्या फेऱ्या कमी झाल्या होते. अशा संकटकाळात अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी गावात अडकल्याची माहिती मिळताच एसटी महामंडळाकडून लांब पल्याचा विशेष गाड्या सोमावरपासून सुरु करण्यात आल्या आहेत. पालघर ते शिरपूर, शहादा ते पालघर, नंदुरबार ते पालघर आणि नाशिक नंदुरबार धुळे जळगाव , कोल्हापूर, रत्नागिरी बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. या बसेस फक्त अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनासाठी आहे.

एसटीच्या अधिकाऱ्यांनी कसली कंबर

कोरोनाच्या जागतिक माहामारीत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कर्मचाऱ्यांना मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आण्यासाठी विशेष लांबपल्याच्या एसटी बेस सुरु केल्या आहेत. तसेच कार्यरत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे निवास न्याहारी, भोजनाची व्यवस्था आणि कामगिरीवर हजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर प्रशासनाकडून पुरविण्यात येत आहे . यात कसलाही कमतरता भासू नयेत, यासाठी सुद्धा एसटी महामंडळाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.


Coronavirus: दारू नाही म्हणून पेंट प्यायले; तिघांचा मृत्यू
Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -