घरCORONA UPDATEमुंबई पोलिसांनी वेळीच केलं रक्तदान, त्यामुळे पार पडली 'शस्त्रक्रिया'!

मुंबई पोलिसांनी वेळीच केलं रक्तदान, त्यामुळे पार पडली ‘शस्त्रक्रिया’!

Subscribe

लॉकडाऊन आणि चक्रीवादळामुळे १४ वर्षीय सना हिचे नातेवाईक रक्तदानासाठी रुग्णालयात पोहचू शकले नाही मात्र रुग्णालय परिसरात आपले कर्तव्य बजावत असलेल्या मुंबई पोलीस दलाच्या पोलीस शिपायाने रक्तदान केल्यामुळे मुंबई पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. रक्तदान करणाऱ्या या पोलीस शिपायाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गौरव केला आहे.

दक्षिण मुंबईतील भेंडीबाजार परिसरात राहणारे खान कुटुंबातील १४ वर्षाची सना ही हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत होती. ३ जून रोजी तिच्यावर ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्यात येणार होती, या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज असल्यामुळे तसेच तीचे रक्तगट A +असल्यामुळे डॉक्टरांनी तिच्या कुटुंबियांना या गटातील रक्ताची गरज भासू शकते असे सांगितले होते. सनाच्या कुटुंबीय रक्ताची व्यवस्था करण्यात जुंपले होते,  मात्र लॉकडाऊन त्यात चक्रीवादळामुळे सनाचे नातेवाईक रक्तदान करण्यासाठी रुग्णालयापर्यत पोहचू शकत नव्हते.

- Advertisement -

अश्या वेळी मुंबई शहर पालक मंत्री अस्लम शेख यांचे ऑपरेटर पोलीस शिपाई मोईन मुजावर यांनी ताडदेव सशस्त्र विभागात असणारे पोलीस शिपाई आकाश गायकवाड यांना संपर्क साधला आणि रक्तदान करण्याबाबत माहिती दिली.

सुदैवाने पोलीस शिपाई आकाश गायकवाड यांचा रक्तगट देखील A+असल्यामुळे त्यांनी ताबडतोब हिंदुजा रुग्णालयाच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. वेळेत रक्तदान केल्यामुळे सनाची ओपन हार्ट सर्जरी ही शस्त्रक्रिया सुरळीत आणि सुखरूपरित्या पार पडली. मुंबई पोलीस दलातील  २०१४ च्या बॅचचे पोलीस शिपाई आकाश गायकवाड हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्याचे असून त्यांना देखील दोन लहान मुले आहेत. ‘ रक्तदान हे महानदान असून मी नेहमी या कार्यात पुढे असतो,असे मुंबईच्या भायखळा पोलीस वसाहतीत राहणारे आकाश गायकवाड हे  ‘आपलं महानगरशी’  बोलताना म्हणाले.

- Advertisement -

पोलीस शिपाई यांच्या कार्यामुळे मुंबई पोलीस दलाची मान अभिमानाने उंचावली असून त्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मुंबई पोलिस दलाचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी म्हटले आहे. पोलीस शिपाइ आकाश गायकवाड  यांच्या कार्याची दखल खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली असून त्यांना त्यांच्या या कामाबद्दल गौरवण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे. पोलीस शिपाई गायकवाड यांचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.


हे ही वाचा – खुशखबर! सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या काय आहे भाव!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -