मुंबईतही टोळ कीटकांची धडक! शोभा डेंपासून अनेकांनी शेअर केले फोटो

मुंबईतही आली टोळधाड?

national locusts attack nearly 10 lakhs locusts from pakistan intrude in india state
टोळ कीटक

आफ्रिकेतून निघालेली टोळधाड येमेन, इराण, पाकिस्तानमार्गे भारतात पोहोचली. देशातल्या अनेक राज्यांमधील पिकांचे नुकसान करणारी ही टोळधाड आता मुंबईत दाखल झाली आहे. राज्यातल्या अमरावती, नागपूर, वर्ध्यात या टोळधाडीने शेतकर्‍यांचे काही प्रमाणात नुकसान केले आहे.

मुंबईत टोळधाड आल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरस आली असून, त्यामध्ये या टोळ कीटकांनी आर्थिक राजधानीत प्रवेश केल्याचा दावा केला आहे. दरम्यान, प्रसिद्ध स्तंभलेखक आणि कादंबरीकार शोभा डे यांनीही टोळ किड्यांचे फोटो शेअर केले असून ते मुंबईत आल्याचा दावा आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

यासह दुसऱ्या ट्विटमध्ये शोभा डे यांनी या टोळ कीटकांचे स्वागत केले असून राजकीय कीटकांशी तुम्ही सोबत करू शकता, असे त्यात म्हटले आहे.

The locusts have landed! Welcome to Mumbai, locustji. Feel free to mingle with our political pests… pic.twitter.com/cr0OIvY8Zm

Shobhaa De (@DeShobhaa) May 28, 2020

शोभा डे यांच्या शिवाय ट्विटर युजर्स नीतू चंद्रा श्रीवास्तव यांनी टोळधाळीच्या झुंडीचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ कुलाबामधील असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान कृषी आणि शेतकरी विभागाने दिलेल्या माहितीनुसार टोळधाडींवर नियंत्रण आणण्यासाठीचे काम सुरू झाले आहे.

तर दूसऱ्या युजरने त्यांच्या घरात आलेल्या टोळ कीटकांचा फोटोदेखील शेअर केला आहे.

करोनानंतर मुंबईकरांना आता टोळधाडीचे संकट

विक्रोळी, ताडदेव, वरळी भागात मोठ्या संख्येने टोळ दिसून आल्यामुळे राज्याच्या इतर भागात धुमाकूळ घालणारी टोळधाड मुंबईत तर दाखल होत नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. करोना संसर्गाच्या संकटाने हैराण झालेल्या मुंबईकरांना आता या टोळधाडीचे संकट सतावू लागले आहे.

मुंबईला धोका नाही

सोशल नेटवर्किंगवर मुंबईत टोळ दिसू लागल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र केंद्रीय कृषी मंत्रालयाअंतर्गत येणार्‍या टोळधाडी संदर्भात माहिती देणार्‍या द लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशनने (एलडब्लूओ) मुंबईला टोळधाडीचा धोका नसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवस यांनी मुंबईकरांसाठी टोळधाडीसंदर्भात कोणताही इशारा देण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.


Locusts Attack: पाकिस्तानातून आलेल्या टोळ कीटकांची देशात दहशत!