घरमुंबईपालघर, सातारा वगळून शिवसेनेच्या २१ उमेदवारांची नावं जाहीर

पालघर, सातारा वगळून शिवसेनेच्या २१ उमेदवारांची नावं जाहीर

Subscribe

अखेर शिवसेना पक्षाने लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि राज्य उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत उमेदवारांची नावं जाहीर केली. पालघर आणि सातारा वगळून राज्यातील २१ जागेच्या उमेदवारांची नावं त्यांनी सांगितली. तर उर्वरित दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा येत्या दोन दिवसांत जाहीर करणार असल्याचेही देसाई यांनी यावेळी म्हटले आहे. त्यामुळे रविवार, २४ मार्च रोजी पालघर आणि सातारा मतदारसंघातील उमेदवाराचे नावं जाहीर होईल. बहुतांश नावं ही गेल्या २०१४ च्या निवडणुकीतील असून काही मतदारसंघातील उमेदवार बदलण्यात आले आहे. यामध्ये उस्मानाबाद खासदार रवींद्र गायकवाड यांचा पत्ता कट करून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पहिल्या यादीतील उमेदवार –

  1. दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
  2. दक्षिण मध्य-मुंबई – राहुल शेवाळे
  3. उत्तर पश्चिम – गजानन कीर्तिकर
  4. ठाणे – राजन विचारे
  5. कल्याण – डॉ. श्रीकांत शिंदे
  6. औरंगाबाद – चंद्रकांत खैरे
  7. बुलढाणा – प्रतापराव जाधव
  8. हिंगोली – हेमंत पाटील
  9. परभणी – संजय जाधव
  10. नाशिक – हेमंत गोडसे
  11. अमरावती – आनंदराव अडसूळ
  12. रायगड – अनंत गीते
  13. कल्याण – डॉ. श्रीकांत शिंदे
  14. यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
  15. हातकणंगले – धैर्यशील माने
  16. मावळ – श्रीरंग बारणे
  17. रामटेक – कृपाल तुमाने
  18. शिरूर – शिवाजीराव आढळराव पाटील
  19. कोल्हापूर – संजय मंडलिक
  20. रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत
  21. उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -