घरमुंबईलोकसभा निकालावर उद्या एक वाजेपर्यंत शिवसेना प्रवक्त्यांचे मौन

लोकसभा निकालावर उद्या एक वाजेपर्यंत शिवसेना प्रवक्त्यांचे मौन

Subscribe

लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या, २३ मे रोजी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्या दुपारी एकपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचे आदेश शिवसेनेकडून प्रवक्त्यांना देण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या, २३ मे रोजी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्या दुपारी एकपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचे आदेश शिवसेनेकडून प्रवक्त्यांना देण्यात आले आहेत. आज, बुधवारी शिवसेना भवनात प्रवक्त्यांची बैठक पार पडली. यावेळी उद्या दुपारी एक वाजेपर्यंत प्रसिद्धी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना शिवसेनेकडून प्रवक्त्यांना देण्यात आल्या. या बैठकीला खासदार संजय राऊत यांनी मार्गदर्शन केलं. असे वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज सेना भवनात उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत उद्या बोलू, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र आता शिवसेनेच्या प्रवक्तव्यांना कोणीतीही प्रतिक्रिया न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एग्झिट पोलचा कौल एनडीएच्या बाजूने

एग्झिट पोलचे आकडे युतीच्या बाजूने आले असले तरी शिवसेने सबुरीची भूमिका घेत निकालाचे चित्र स्पष्ट होईपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचे आदेश शिवसेना नेत्यांना देण्यात आले आहे. अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर विविध एग्झिट पोलमधून एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र पहायला मिळाले. महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा युतीला ३५ ते ४० च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज एग्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला होता. यामध्ये शिवसेनाला १६ ते १९ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र तरीही शिवसेनेनं एक वाजेपर्यंत आपल्या प्रवक्त्यांना माध्यमांशी न बोलण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुपारपर्यंत मतमोजणीचा कल स्पष्ट होऊ शकतो. त्यामुळेच शिवसेनेकडून ही सूचना केली गेल्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -