घरमुंबईकुर्ल्यात सापडला बेपत्ता तरुणाचा मृतदेह

कुर्ल्यात सापडला बेपत्ता तरुणाचा मृतदेह

Subscribe

गेल्या रविवारी घराबाहेर पडलेल्या एका तरुणाने रात्री त्याच्या भावाला आपण घरी येत असल्याचे सांगितले. मात्र डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील एका बारमध्ये मित्रांबरोबर पार्टी करत असताना अचानक त्यांच्यात भांडणे होवून तो तरुण बेपत्ता झाला. त्या तरुणाचा बुधवारी कुर्ल्यात मृतदेह सापडला.

मिथुन टक्के असे त्याचे नाव असून तो रविवारी त्याच्या दोन मित्रांबरोबर डोंबिवली रेल्वे स्थानक पूर्वेकडील एका बारमध्ये पार्टी करण्यासाठी गेला होता. बारमधून बाहेर येताना मिथुनने त्याच्या भावाला मोबाईलरुन घरी परत येत असल्याचे सांगितले होते. मात्र तो परतलाच नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या मित्राला फोन करुन मिथुनबाबत चौकशी केली होती.

- Advertisement -

मिथुन गायब झाल्याने त्याच्या कुटुंबाने. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यातच त्याचा मोबाईलही बंद येत होता. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबाने याबाबत त्याच्या मिसिंगची तक्रार टिळक नगर पोलीस ठाण्यात केली. मात्र तीन दिवसानंतरही त्याचा शोध लागला नाही. मात्र काल सकाळी कुर्ला आणि सायन रेल्वे स्थानकांदरम्यान, रेल्वे रुळवर मिथुनचा मृतदेह आढळून आला.

आरफीएफच्या जवानांनी त्याची ओळख पटवत त्याच्या कुटुंबियांना फोनवरुन ही माहिती दिली. काल मिथुनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात नेण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर मिथुनच्या मृत्यूचे कारण समजणार आहे.

- Advertisement -

सीसीटीव्हीत ‘दारुपार्टी’ कैद

डोबिवलीच्या ज्या बारमध्ये मिथुन आणि त्याच्या मित्रांची दारु पार्टी झाली ती पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या पार्टीत मिथुन आणि त्यांच्या मित्रात शाब्दिक भांडण झाल्याचे दिसत आहे. मात्र त्यानंतर काही वेळातच मिथुन त्या पार्टीमधून निघून गेला. काही मिनिटांनी त्याचे दोन मित्रही बार मधून निघून गेल्याचेही दिसत आहे.

नितीन बिनेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -