घरमुंबईलव्ह ,सेक्स ,पैसे आणि धोका

लव्ह ,सेक्स ,पैसे आणि धोका

Subscribe

घाटकोपर पूर्व येथील सोने-चांदी आणि हिरे व्यावसायिक राजेश्वर उदानी (५७ वर्ष) यांच्या हत्येप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी सचिव सचिन पवार याला शनिवारी रात्री अटक केली. सचिनसोबत हत्यारी विभागाचा कॉन्स्टेबल दिनेश पवार यालाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी टीव्ही अभिनेत्री देबोलिना भट्टाचार्यचीही चौकशी करण्यात आली. मात्र तिला सोडून देण्यात आले. उदानी यांची हत्या देबोलिनाशी झालेल्या वादातून आणि पैशांच्या व्यवहारातून झाली असल्याची चर्चा रंगली आहे. दिनेश पवारला शुक्रवारी ३७६च्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. उदानी यांच्या हत्येतील मास्टर माईंड म्हणून दिनेशचे नाव पुढे आले आहे. हिंदी चित्रपटातील लव्ह, सेक्स आणि धोका या प्रेमाच्या त्रिकोणाचा अँगल या हत्येत पोलीस तपासत आहेत. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सचिन पवारची मैत्रीण असलेल्या एका अभिनेत्रीसोबत उदानी यांचे संबध होते. यातूनच सचिन पवार आणि दिनेश पवार यांनी कट करून ही हत्या केली असल्याचे कबूल केले. दिनेश पवार हा निलंबित पोलीस हवालदार असून तो पंतनगर पोलीस ठाण्यात कामाला होता. बलात्कार प्रकरणात एप्रिल महिन्यात त्याला निलंबित करण्यात आले होते. घाटकोपर पूर्व कामा लेन, येथील महालक्ष्मी अपार्टमेंट या ठिकाणी आपल्या कुटुंबियांसह राहणारे हिरे व्यापारी राजेश्वर उदानी हे 28 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाले होते. उदानी हे हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी तसेच एम. एफ. हुसेन यांच्या चित्रांचे विक्रेतेही होते. रात्र रात्रभर घराबाहेर राहणारे उदानी यांचा मृतदेह 4 डिसेंबर रोजी नेरवाडी येथील जंगलात पनवेल पोलिसांना कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता.

- Advertisement -

घाटकोपरच्या पंतनगर पोलीस ठाण्यात उदानी यांची हरवल्याची तक्रार दाखल होती. 7 नोव्हेंबर रोजी कपडे आणि कमरेच्या पट्ट्यावरून उदानी यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उदानी यांच्याजवळ पनवेल तालुका पोलिसांना काहीही मिळाले नव्हते. तसेच त्यांचे दोन्ही मोबाईल गायब होते. उदानी यांचे दोन्ही मोबाईल फोनचे शेवटचे लोकेशन वाशी टोलनाका असे होते. या शिवाय उदानी यांच्या मोबाईलवर शेवटचे कॉल सचिन पवार यांचे होते, पंतनगर पोलिसांनी वेळ न दडवता सचिनला गुहावटी येथून ताब्यात घेऊन शनिवारी त्याला मुंबईला आणले आहे.

पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार सचिनला ताब्यात घेण्यात आले त्यावेळी त्याच्यासोबत एका हिंदी मालिकेतील अभिनेत्रीही सोबत होती. उदानी यांच्या संपर्कात देखील हिंदी मालिकेत काम करणार्‍या नटी, मॉडेल होत्या, तसेच सचिनसोबत असणारी नटी देखील उदानी यांच्या संपर्कातील असल्याची चर्चा पोलीस दलात रंगली आहे. पोलिसांनी या प्रकरणी या अभिनेत्रीला देखील चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, तिच्याकडेही या हत्येप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. तसेच या नटीवरूनच सचिन आणि उदानी यांच्यात वाद होता, असेही स्थानिक राजकीय वर्तुळात बोलले जात होते.

- Advertisement -

देबोलिना २८ वर्षांची असून स्टार प्लसच्या ‘साथ निभाना साथिया’ या सिरियलमध्ये गोपी बहू म्हणून काम करते. मागील ५ वर्षांपासून देबोलिना मॉडेल गायिका, अभिनेत्री म्हणून काम करत आहे.

सध्या सर्वाधिक मानधन घेणारी ती सिरियलमधील अभिनेत्री आहे. चौकशीसाठी देबोलिनाला मुंबई पोलिसांनी मुंबई एअरपोर्टवरून ताब्यात घेतल्याने छोट्या पडद्यावरील कारनामे पुढे आलेत.

सचिन पवार हा 2009 मध्ये भाजपचा बूथ प्रमुख होता. त्या अगोदर २००४ ते २००९ सचिन हा विद्यमान गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचा सचिव होता. 2012 मध्ये अपक्ष म्हणून महापालिका निवडणूक लढविली होती. त्यानंतर त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. २०१७ साली पुन्हा भाजपात आल्यानंतर तो घाटकोपर पूर्वचा महामंत्री झाला.

घाटकोपर येथील सोने-चांदीचे सराफा व्यापारी राजेश्वर उदानी (५७) 28 नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. ४ डिसेंबर रोजी पनवेलच्या जंगलात उदानींचा मृतदेह सापडला. त्यांच्या फोन कॉल्स डीटेलमधून अनेक बारबाला, मॉडेल यांचे फोन नंबर सापडले. सचिन पवार यांनीच उदानी यांची गोपी बहू सिरियलची अभिनेत्री देबोलिनाची ओळख करून दिली होती.उदानी आणि देबोलिना एकमेकांच्या संपर्कात होते.

सचिन पवारशी माझा संपर्क आणि संबंधही नाही- प्रकाश मेहता
घाटकोपरमध्ये एका उद्योजकाच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सचिन पवार आणि माझा सध्या कोणताही प्रकारे संबंध नाही. 2004 ते 2009 या कालावधीत तो माझ्याकडे सहाय्यक म्हणून काम करत होता. परंतु मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढल्यामुळे पक्षाने त्याच्यावर कारवाई करत त्याला पक्षातून काढून टाकले. तेव्हापासून आजपर्यंत या व्यक्तीशी माझा संपर्क आलेला नाही. या 9 वर्षात पक्ष स्तरावर आणि कर्मचार्‍याच्या स्वरुपात सुद्धा माझा त्याच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क आलेला नाही. आताही तो माझा सहाय्यक नाही. अशा परिस्थितीत सचिन पवारसोबत माझं नाव जोडणं अत्यंत चुकीचं आहे. मुंबई पोलीस देशातील एक सक्षम यंत्रणा आहे. त्यामुळे मला वाटतं की पोलिस जलदगतीने अधिक योग्य कारवाई करून गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा मिळवून देतील. भाजपने कोणत्याही गुन्हेगारी किंवा बेकायदेशीर कामांचे समर्थन केले नाही. अशी प्रतिक्रिया गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -