घरमुंबईअवयवदानासाठी आता वेबसाईटची होणार मदत!

अवयवदानासाठी आता वेबसाईटची होणार मदत!

Subscribe

अवयवदानाची प्रक्रिया अधिक सोपी व्हावी, यासाठी आता महाआयुदान ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे.

सरकार, सामाजिक संस्था आणि वैयक्तिक सहभागामुळे अवयवदानाची संख्या वाढत आहे. पण, अवयवदान आणि प्रत्यारोपणासाठी नोंदणीकृत हॉस्पिटल्स नेमकीच असून अवयवदानातील हॉस्पिटल्सचा सहभाग वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी www.mahaayudaan.in ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या महाआयुदान वेबसाईटमधून अवयवदानात हॉस्पिटल्स सहभागी होऊ शकतात. या वेब पोर्टलचे उद्घाटन राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक डॉ. सतीश पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

अवयवदानाची प्रक्रिया आता सोपी

या पोर्टलमुळे दररोज अवयवांचे होणारे दान आणि प्रत्यारोपण ही दोन्ही प्रकारची माहिती मिळणं शक्य होणार आहे. पण, दात्याची किंवा याचकाची माहिती या पोर्टलवर नमूद केली जाणार नाही. अवयवदान नोंदणी आणि गरज दोन्हीच्या तात्काळ माहितीमुळे रूग्णांना फायदा होणार असल्याचे आरोग्य संचलनालयाचे सहाय्यक संचालक डॉ. अरुण यादव यांनी स्पष्ट केलं आहे. मागणीची तथा पुरवठ्याची अद्ययावत नोंदणी होणं गरजेचं असल्याचं यादव यांनी सांगितलं. यापूर्वी एखाद्या उतीचे, अवयवाचे, डोळ्याचे कोणतेही दान केल्यास हॉस्पिटलकडून ते विभागीय अवयवदान समितीला सांगितलं जात होतं. त्यानंतर तिथून ते आरोग्य विभागाला कळवलं जात होतं. ही प्रक्रिया आता सोपी झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दिंडीतून दिले अवयवदानाचे धडे

६४ हॉस्पिटलमध्ये अवयवांचे जतन

एक अवयव प्रत्यारोपण करायचं असल्यास राज्यात १३७ हॉस्पिटल्समधून प्रक्रिया केली जाते. तर, एकाहून अधिक अवयव प्रत्यारोपित करायचे असल्यास ३७ हॉस्पिटल्समध्ये प्रक्रिया केली जाते. तसंच, ६४ हॉस्पिटल्समध्ये फक्त अवयवदान होऊन जतन करण्याचं काम केलं जातं.

पोर्टलवरची माहिती

१) दररोज होणारे अवयव दान आणि प्रत्यारोपण यांची माहिती
२) दात्याचे किंवा याचकाचे नाव पोर्टलवर दाखवण्यात येणार नाहीत
३) अवयवदान नोंदणी आणि गरज दोन्हींच्या तात्काळ माहितीमुळे फायदा होऊ शकेल
४) मागणीची तथा पुरवठ्याची अद्ययावत नोंदणी गरजेची

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -