घरमुंबईमहापरिनिर्वाण दिनाचा सत्ताधाऱ्यांना विसर

महापरिनिर्वाण दिनाचा सत्ताधाऱ्यांना विसर

Subscribe

सत्ताधाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा विसर पडल्याचे बोलत बहुजन वंचित आघाडीकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वच स्तरातून या महामानवाला अनेक ठिकाणी अभिवादन करण्यात येत असतानाच ठाणे पालिका सभागृहनेते पदी माजी महापौर अशोक वैती यांची नियुक्ती झाल्याचा जल्लोष पालिका मुख्यालयासमोरच करण्यात आला. महामानव डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनीच हा जल्लोष केल्याने दलित समाजाच्या भावना दुखावल्या असून जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी बहुजन वंचित आघाडीचे राजाभाऊ चव्हाण यांनी केली. मुख्यालयासमोरच कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत शिवसेनेचे पदाधिकारी आणि पालिका सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदविला आहे.

संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची वंचित आघाडीची मागणी

नवनिर्वाचित सभागृहनेते अशोक वैती आणि सत्याताधारी यांना घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा विसर पडला आहे. दलित समाजासाठी हा दुःखाचा दिवस असताना सभागृहनेते पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी जल्लोष आणि ढोलताशांचा गजर करण्याचा प्रकार करून त्यांनी महामानव डॉ. आंबेडकरांचा अवमान केला आहे. दलितांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी बहुजन वंचित आघाडीचे राजाभाऊ चव्हाण यांनी केली आहे.अशोक वैती यांची सभागृहनेते पदी निवड झाल्यानंतर ते सभागृह पदाचा पदभार स्वीकारणार होते. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी देखील केली होती. संपूर्ण कार्यालय फुलांनी सजवले होते. तर मुख्यालयाच्या बाहेर बँडबाज ठेवण्यात आला होता. मात्र, महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी बँडबाजा वाजवणे आणि फटाके वाजवण्याच्या कृतीवर कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत हे ठिय्या आंदोलन केले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत बँडचे संपूर्ण साहित्य जप्त करून या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात येण्याची विनंती केल्याने प्रकरण निवळले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Video: ठाण्यात आरपीएफच्या जवानाने वाचवले प्रवाशाचे प्राण!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -