Sunday, January 17, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई 'महाकाली गुंफेच्या नावाखाली ठाकरे सरकार करतेयं घोटाळा'

‘महाकाली गुंफेच्या नावाखाली ठाकरे सरकार करतेयं घोटाळा’

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा आरोप

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकार मुंबईतील काही बिल्डरांना फायदा मिळवून देण्यासाठी अंधेरी येथील सुमारे २ हजार वर्षांपुर्वीच्या महाकाली गुंफा व मंदिराचा टीडीआर पास केला आहे. यात ठाकरे सरकार मोठा घोटाळा करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

 

- Advertisement -

या निषेधार्थ आज विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली महाकाली गुंफा येथे सरकारच्या कृतीचा निषेध करत बिल्डरच्या चरणी लोटांगण घालण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करित असून मुंबईची एक इंचही जागा बेकायदेशीरपणे बिल्डरला विकू देणार नाही व असा कोणीही प्रयत्न केला तर त्याची किंमत ठाकरे सरकारला मोजावी लागेल असा इशारा प्रविण दरेकर यांनी यावेळी ठाकरे सरकारला दिला.

 

- Advertisement -

यावेळी बोलताना प्रविण दरेकर यांनी , ठाकरे सरकार मुंबई विकायला निघाली आहे. येथील स्थानिकांच्या विकासाकडे लक्ष दयायला सरकारला वेळ नाही. पण येथील टीडीआरच्या माध्यमातून सुमारे २०० कोटी बिल्डरच्या घशात कसे जातील याकडे सरकारचे जास्त लक्ष आहे. आज झोपडीत राहणाऱ्याला, चाळीत राहणाऱ्याला, गोरगरिबाला घर घेण्यात अडचणी येत आहे. त्यांची काळजी नाही या ठाकरे सरकारला नाही, त्यांचा विकास रखडला आहे. त्यांच्यासाठी विशेष काही करायचं नाही परंतु सत्तेसाठी बिल्डरपुढे लोटांगण घालण्याचे काम या सरकारचा सुरु असल्याची टीकाही यांनी यावेळी केली.
सरकार सत्तेत आल्यापासून मराठी अस्मिता विसरली आहे. सरकराच्या संवेदना मेलेल्या आहेत. ठाकरे सरकारची भूमिका ही केवळ सत्ता टिकविणे हीच आहे. मात्र भाजप नेहमी जनतेच्या पाठीशी आहे, म्हणूनच जेव्हा येथील नागरिकांवर अन्याय होत आहे, तेव्हा आम्ही आज येथे आलो. मुंबईच्या इंच इंच जागेच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ, पण मुंबईची जागा कोणालाही बेकायदेशीररित्या विकू देणार नाही असेही दरेकर यांनी ठामपणे सांगितले.

 

मुंबई महापालिका व सरकारच्या बेकायदेशीर कृतीचा यावेळी भाजपाच्यावतीने निषेध करण्यात आला. ठाकरे सरकारचा निषेध असो…आघाडी सरकार हाय हाय…अशा जोरदार घोषणाबाजी भाजपाच्यावतीने करण्यात आली. भाजपाचे नेते किरिट सोमैय्या यांच्यासह मुंबई भाजप जिल्हा अध्यक्ष संतोष मेढेकर, मुंबई भाजप उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, नगरसेवक पंकज यादव, नगरसेविका प्रिती साटम व भाजप महामंत्री मुरजी पटेल, पदाधिकारी अशोक गोगरी,संदीप दुबे, रमण झा, सुभाष दरेकर, शेखर तावडे यांच्यासह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.


हेही वाचा – कंगनाने साधला शिवसेनेवर निशाणा; म्हणाली आता लढाई हायकोर्टात

- Advertisement -