घरमुंबईनिवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात १० हजारांची वाढ; 'हे' आहेत ठाकरे मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे...

निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात १० हजारांची वाढ; ‘हे’ आहेत ठाकरे मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय

Subscribe

जाणून घ्या कॅबिनेटचे महत्त्वाचे निर्णय

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठीकत राज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणा-या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय आज झाला. तसेच देवेंद्र फडणवीस सरकारमधल्या जलयुक्त शिवारच्या चौकशीचाही निर्णय याच बैठकीत घेण्यात आला आहे. यासह या बैठकीत काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

जाणून घ्या, ठाकरे मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय

नव्याने निर्माण करण्यात आलेला राज्य निवडणूक विभाग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयासाठी निर्माण केलेल्या १२८ पदांना कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यासह राज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणा-या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपये वाढ करण्याचा निर्णयही झाला. तर नगर विकास विभागाकडून नागपूर शहर व परिसरातील रेल्वे मार्गावर आधुनिक प्रकारच्या वातानुकुलित बी.जी.मेट्रो ट्रेन सुरु करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

हे देखील निर्णय आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आले

  • डाळीसाठी दर नियंत्रक विधेयकाचे प्रारुप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • कोविडमुळे सहकारी संस्थांतील महत्वाच्या विषयांच्या मंजुरीचे अधिकार संचालक मंडळाला दुरुस्ती करण्याचा निर्णय, अधिनियमात सुधारणा करण्यात आली
  • केंद्र शासनपुरस्कृत “अटल भूजल (अटल जल) योजना” राज्यात राबविण्यास मान्यता
  • मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, तुकड्या/अतिरिक्त शाखा यांना २० टक्के अनुदान देणे तसेच २० टक्के अनुदान सुरु असलेल्या शाळांना वाढीव टप्पा अनुदान देण्याच्या अटींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय
  • राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णयही आज झाला.

काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा; प्रभाग समिती निवडणुकीत सेनेच्या बाजूने मतदान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -