घरमुंबईडहाणू परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरले

डहाणू परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरले

Subscribe

डहाणूतील ग्रामीण भागात रविवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले होते.

डहाणू परिसरात रविवारी सौम्य भूकंपाचे धक्के बसल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. डहाणू तालुक्यातील धुंदलवडी परिसरात रविवारी मध्यरात्री तीन वेळा हादरे बसल्याचे जाणवले. पहिला भूकंप १ वाजून ३५ मिनिटांनी झाला तर दुसरा भूकंप १ वाजून ४५ मिनिटांनी आणि तिसरा भूकंप २. ०५ मिनिटांनी बसला आहे. हे भूकंपाचे धक्के सौम्य जरी असले तरी मात्र संपूर्ण भितीचे वातावरण पसरले आहे.

या गावात जाणवले भूकंपाचे धक्के

या भूकंपाच्या धक्क्यामुळे तालुक्यातील धुंदलवाडी हळदपाडा, दापचरी, शिसने, आंबोली, चींचले, नागझरी, वांकास वसा, करांजविरा, तलोटे, पुंजवा तसेच तलासरी तालुक्यातील काही गावात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे या गावतील काहींनी घराबाहेर राहून रात्र घालवली आहे. तसेच भूकंपाचे धक्के झाई तसेच चरोटींपर्यंत जाणावले आहेत.

- Advertisement -

वाचा – राजधानीत सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के


या आधी ही जाणवले भूकंपाचे धक्के

या आधी देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.२५ वाजता ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर नोव्हेंबर रोजी सायंकाळी ३.१५ वाजता ३.३ रिश्टरचे मोठे धक्के बसले होते. सेच २४ ऑक्टोबर रोजी पहिला मोठा धक्का बसला होता. यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र अनेकांच्या घराला तडे जाऊन घरांचे, शासकीय इमारतीचे नुकासान झाले होते. या भागात सातत्याने होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

- Advertisement -

वाचा – कल्याण,डोंबिवली, टिटवाळ्याला भूकंपाचे धक्के


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -