सत्ता स्थापनेसंदर्भात महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची व्हाट्सअॅप ग्रूपवर चर्चा

सोशल मीडियावर सध्या प्रत्येक घडामोडींवर मिम्स व्हायरल होत असतात. आता राज्यातील सत्ता स्थापनेबाबत सर्व पक्षांच्या नेत्यांची व्हाट्सअॅपवर चर्चा झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडियावर त्यांच्या व्हाट्सअॅप ग्रूपवरील चर्चेचे स्क्रिनशॉटही व्हायरल होत आहेत.

Mumbai

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १५ दिवस उलटून गेले तरीही राज्यात सत्ता स्थापन झालेली नाही. सत्ता स्थापनेचा पेच दिवसेंदिवस वाढत जात असताना सोशल मीडियावर यावरुन विनोदाचा धुमाकुळ माजला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यातील मतभेद टोकाला गेले आहेत. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर अडून बसले आहेत. तर शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत दररोज प्रसारमाध्यमांसमोर येऊन शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर प्रचंड मिम्स व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर सध्या प्रत्येक घडामोडींवर मिम्स व्हायरल होत असतात. आता राज्यातील सत्ता स्थापनेबाबत सर्व पक्षांच्या नेत्यांची व्हाट्सअॅपवर चर्चा झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडियावर त्यांच्या व्हाट्सअॅप ग्रूपवरील चर्चेचे स्क्रिनशॉटही व्हायरल होत आहेत.

व्हाट्सअॅप ग्रूपमध्ये नेमकी काय झाली चर्चा?

व्हायरल होणाऱ्या मॅसेजनुसार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यांच्या कन्या सुप्रीया सुळे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, भाजपचे देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांची व्हाट्सअॅपवर चर्चा सुरु आहे. या गृपमध्ये शिवसेनेकडून भाजपवर आणलेला दबाव, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात असणारा सत्ता स्थापनेचा दावा आणि ईडी आणि सीबीआय प्रकरण यावर भाष्य करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here