घरमहाराष्ट्रDongriBuildingCollapse : 'या घटनांना सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार'

DongriBuildingCollapse : ‘या घटनांना सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार’

Subscribe

मुंबईत पुन्हा एकदा इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंगरी परिसरातील कौसरबाग ही चार मजली इमारत कोसळली असून त्याच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ४५ जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर विरोधकांनी पुन्हा सरकार व पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, सरकारच्या नाकर्तेपणाचे हे उदाहरण आहे. जुन्या इमारतीच्या रिपेरिंगची जबाबदारी ही सरकारच रिपेर बोर्डची असते. तिथे राहणाऱ्यांच्या पुनर्वसन करणं गरजेचं आहे. त्यामुळे पालिका काय किंवा सरकार काय ही सामुहिक जबाबदारी आहे. मात्र या घटनेसाठी ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल करून अधिकाऱ्यांना अटक करण्याची आमची मागणी आहे. राज्याचे मुख्यमंत्री संवेदनहीन आहेत. त्यांना लोकांचे जीव गेल तरी काही वाटतं नाही. पालिकेचे हे अपयश आहे, असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेच्या विरोध पक्षनेत्याची प्रतिक्रिया 

नागरिकांनी महापालिकेच्या नोटिसीची अंमलबजावणी करायला हवी. आधी अडकलेल्यांना बाहेर काढणं ही प्रार्थमिकता असणार आहे. त्यानंतर इन्व्हेस्टीकेशनची आमची मागणी असणार आहेत.
– रवी राजा, विरोधी पक्षनेते, महापालिका

- Advertisement -

Breaking : मुंबईतील डोंगरीत चार मजली इमारत कोसळली


मुंबई शहरातील अत्यंत दुर्दैवी घटना झाली आहे. तातडीने सर्व संबंधितावर कारवाई व्हावी, घरमालकांसह संबंधीत सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी. त्यांची चौकशी व्हावी. एक इमारत पडली तर त्यांची वर्षानुवर्ष चौकशी होत नाही. लोकांसमोर रिपार्ट मांडणे गरजेच आहे. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन या संदर्भातील धोरणाची अमलबजावणी करणं महत्वाचं आहे. कायम या संदर्भातील स्वरुपी तरतुदी करणं गरजेच आहे. आपण टाईम बॉम्बवर राहतोय, हे टाईम बॉम्ब कधी फुटले हे कळू शकतं नाही. जे मृत्युमुखी झाले आहेत तसेच होवू नये.
– सचिन अहिर, मुंबई अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -