घरमुंबई'लंडन आय'च्या धर्तीवर मुंबईत साकारणार 'मुंबई आय'

‘लंडन आय’च्या धर्तीवर मुंबईत साकारणार ‘मुंबई आय’

Subscribe

आपल्या भव्यतेसाठी प्रसिद्ध असलेल्या लंडन येथील लंडन आयप्रमाणे मुंबईतही लवकरच मुंबई आय सुरु करण्यात येणार आहे.

आपल्या भव्यतेसाठी प्रसिद्ध असलेल्या लंडन येथील लंडन आयप्रमाणे मुंबईतही लवकरच मुंबई आय सुरु करण्यात येणार आहे. तशी घोषणा बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत केली. यासाठी वांद्रे वरळी सी-लिंक येथील एक जागा निश्चित करण्यात येणार आहे. लवकरच हे आय कसे असेल, याची सविस्तर माहिती जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईतील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी

राज्य मंत्री मंडळाची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अनेकांनी सकारात्मक पवित्रा दर्शविला आहे. त्यानंतर त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी मुंबई आयबद्दलची घोषणा केली. या प्रकल्पामुळे मुंबईतही पर्यटन व्यवसायाला आणखीन चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

वांद्रे रिक्लेमेशेनच्या समोर मुंबई आय सुरु करणार

याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, “लंडन येथील लंडन आय याने जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. तो बघण्यासाठी लाखो पर्यटक त्याठिकाणी भेट देत असतात. त्यानुसार मुंबईतही अशा प्रकारचे मुंबई आय असावे, असा प्रस्ताव आपण मांडला होता. ज्याला सकारात्मक पवित्रा दर्शविण्यात आला आहे. यासाठी वांद्रे वरळी सी-लिंक शेजारील एक जागा निश्चित करण्याचा विचार सुरु आहे. सी-लिंकच्या टोल नाक्या शेजारी असणाऱ्या जागेत हे मुंबई आय सुरु करण्याचा विचार सुरु आहे. त्याबाबत लवकरच अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वांद्रे रिक्लेमेशेनच्या समोर हे मुंबई आय सुरु करण्याचा विचार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे लंडन आय?

लंडन आय हा लंडन शहरामधील एक अजस्त्र पाळणा (जायंट व्हील/फेरिस व्हील) आहे. थेम्स नदीच्या काठावरील लंडन आय हे युनायटेड किंग्डममधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ व लंडनमधील सर्वात प्रसिद्ध खुणांपैकी एक मानले जाते. येथे दरवर्षी सुमारे ३५ लाख पर्यटक भेट देतात. १३५ मीटर उंचीचा हा पाळणा ३१ डिसेंबर १९९९ रोजी खुला करण्यात आला. ह्याच्या बांधकामासाठी सुमारे ७ कोटी पाउंड इतका खर्च करण्यात आला. लंडन आयमध्ये ३२ अंडाकृती आकाराच्या कूप्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -