सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश रद्द

Tukaram-Mundhe-
तुकाराम मुंढे

नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांची काही दिवसांपूर्वी बदली करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा त्यांच्या बदलीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे सदस्य सचिव म्हणून बदली झाली होती. परंतू राज्य सरकारने अवघ्या १५ दिवसात हे आदेश मागे घेतले आहेत. तुकाराम मुंढे यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली.

तुकाराम मुंढे यांची २६ ऑगस्टला मुंबईत बदली करण्यात आली होती. तर त्यांच्याकडे असलेल्या नागपूर महापालिका आयुक्तपदाचा कारभार राधाकृष्णन बी. यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तुकाराम मुंढे यांना बदलीनंतर देण्यात आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. निंबाळकर हे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. नागपूर जिल्हा परिषदेवर २००८ साली तुकाराम मुंढे यांची सीईओ म्हणून नियुक्ती झाली. त्याच दिवशी त्यांनी शाळेला भेटी दिल्या आणि गैहजर शिक्षकांचे निलंबन केले. वैद्यकीय कारभारात अनियमितता दिसल्याने काही डॉक्टरांनाही निलंबित केले.

हेही वाचा –

मुंबईकरांसाठी Good News! मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दाखल होणार १० METRO ट्रेन्स