घरमुंबईएटीएम फसवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर

एटीएम फसवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर

Subscribe

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका सर्वेक्षणातून एटीएमच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वाधिक फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. तर राजधानी दिल्ली एटीएमद्वारे फसवणुकीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे एटीएम फसवणुकीची एकही घटना अरुणाचल प्रदेश, आसाम आणि त्रिपुरा या तीन राज्यांमध्ये समोर आलेली नाही.

चोरटे एटीएमला स्कीमर बसवून तर कधी मशीन फोडून ग्राहकांच्या पैशांवर डल्ला मारतात. चोरट्यांनी आतापर्यंत अनेक ग्राहकांच्या मेहनतीचा पैसा चोरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हे कमी होते म्हणून की काय औरंगाबादमध्ये काही दिवसांपूर्वीच चक्क एटीएम मशीन पळवल्याची घटना घडली होती. आपण नेहमीच एटीएम चोरीच्या किंवा फसवणुकीच्या घटना ऐकतो. पण यात आता एटीएमद्वारे झालेल्या फसवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे उघड झाले आहे.
२३३ महाराष्ट्रात एटीएम फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. यात ४.८१ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. राजधानी दिल्ली एटीएमद्वारे होणार्‍या फसवणुकीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. एटीएम फसवणुकीच्या १७९ घटना दिल्लीत समोर आल्या असून यात २.९० कोटी रुपयांचे नुकसान झाले. तामिळनाडूत एटीएमद्वारे ३.६३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -