घरमुंबईमाढात भाजपचाच खासदार होणार - मुख्यमंत्री

माढात भाजपचाच खासदार होणार – मुख्यमंत्री

Subscribe

बुधवारी रणजीत पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी माढामधून बीजेपी सरकारच येणार असल्याचं सुतवाच मुख्यमंत्री यांनी केले. त्याचप्रमाणे पाटील घराण्याशिवाय महाराष्ट्राच राजकारण पुर्ण होत नसल्याचही मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे.

रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून थेट भाजपात प्रवेश केला. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मोहिते-पाटील या घराण्याचा जो मान कायम आहे तो तसाच राहिल असं आश्वासन रणजितसिंह मोहिते-पाटील यांना दिलं.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘महाराष्ट्रातील हा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे. महाराष्ट्राचं राजकारण ज्या मोहिते घराण्याशिवाय पूर्ण होत नाही. पहिल्यांदा महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या सहकारमहर्षी शंकरराव मोहितेपाटील, या महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आता याच घराण्यातील तिसरी पिढी म्हणून गेले १५-२० वर्षे कार्यरत असणाऱ्या एक युवानेता रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला याचा आनंद आम्हाला होत आहे.’

- Advertisement -

माढात भाजपचाच खासदार होणार

माढा खासदार हा देखील मोदींसाठी हात वर करणारा हवा. रणजितसिंह मोहिते – पाटील यांच्या भाजपात आल्यामुळे माढाचा खासदार ही भाजपचाच होणार. रणजितसिंह आले तर, विजयसिंह मोहिते-पाटील यांचं काय?  पण, रणजितसिंह हे विजयसिंह यांच्या आशीर्वादानेच भाजपात आले आहेत. यापुढची चर्चा त्यांच्याशीच केली जाणार आहे. त्यामुळे या पुढे राजकीय चर्चेचं काही कारण नाही. मोहिते-पाटील या घराण्याचा जो मान आहे तो भाजपमध्ये आम्ही कधीही कमी होऊ देणार नाही. त्यासोबतच ४५ नाहीतर ४८ जागांसाठी वाटचाल करण्याचं आवाहन ही त्यांना कार्यकर्त्यांना केलं.

- Advertisement -

भाजपप्रणित एनडीएचं सरकार येणार यात शंका नाही

रणजितसिंह पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडीएचेच सरकार येणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले,” माझी आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांना आधीपासूनच एकत्र काम करण्याची इच्छा होती. त्यानुसार, बैठका ही झाल्या होत्या. पण, आता एकत्रित काम करण्याची संधी मिळाली आहे. सोलापूर, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न एकत्रितपणे केला जाणार आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रवेश केला आहे. त्यामुळे निश्चित भाजपाची ताकद वाढली आहे. देशातील वातावरण पाहिलं तर आपल्याविरोधात अनेक जण एकत्र येतात. पण, ते एकमेकांच्या पायात-पाय घालून पडत आहेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा बहुमताने भाजपप्रणित एनडीएचं सरकार येणार याबद्दल कोणाच्याही मनात शंका नको.

रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून थेट भाजपात प्रवेश केला. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मोहिते-पाटील या घराण्याचा जो मान कायम आहे तो तसाच राहिल असं आश्वासन रणजितसिंह मोहिते-पाटील यांना दिलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -