घरमुंबईमहात्मा गांधी पथक्रांती योजना घोटाळ्यातील दोन आरोपींना अटक

महात्मा गांधी पथक्रांती योजना घोटाळ्यातील दोन आरोपींना अटक

Subscribe

महात्मा गांधी पथक्रांती योजना घोटाळ्यातील दोन वॉण्टेड आरोपींना गुरुवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अब्दुल गफार अब्दुल सत्तार आणि अनंत पंढरी कदम अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत अलअमीन मोहम्मद सलीम खान आणि बिलाल अब्दुल रफिक शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. या दोघांविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आले असून याच आरोपपत्रात अब्दुल आणि अनंत या दोघांना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले होते.

राज्य शासनाने मुंबई शहरात वास्तव्यास असलेल्या 2000 पर्यंतच्या सर्व झोपडीधारकांना पात्र ठरवून तसेच रोड कटींगमुळे ज्या झोपडीधारकांना घर खाली करण्याचे आदेश दिले होते, अशा लोकांची शहानिशा करुन त्यांना एमएमआरडीए, एसआरए आणि म्हाडामध्ये सदनिका दिली जात होती. या झोपडीधारकांचे आवश्यक कागदपत्रे तपासून नंतर त्यांना चेंबूर परिसरात सदनिका देण्यात आली होती. मात्र महात्मा गांधी पथक्रांती योजनेत काही दलालांनी मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार केल्याचे दिसून आले होते.

- Advertisement -

अपात्र झोपडीधारकांचे बोगस दस्तावेज बनवून त्यांना पात्र दाखवून त्यापैकी 28 लोकांना सदनिका मिळवून देण्यात आले होते. हा प्रकार उघडकीस येताच या संपूर्ण प्रकरणाची गुन्हे शाखेकडून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानंतर पोलिसांनी अशा दलालांविरुद्ध धडक मोहीम सुरु केली होती. ही मोहीम सुरु असतानाच 1 जानेवारी 2019 रोजी अलअमीन सत्तार आणि बिलाल शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -