घरमुंबईस्फोटाच्या भीतीने माहुल रिकामे

स्फोटाच्या भीतीने माहुल रिकामे

Subscribe

चेंबूरच्या भारत पेट्रोलियम प्लांटला बुधवारी आग लागली. या आगीपासून काही अंतरावरच मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. पेट्रोलियम प्रकल्पाचा झालेला स्फोट आणि लागलेली आग यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये भीतीचे वातावरण आहे

चेंबूरच्या भारत पेट्रोलियम प्लांटला बुधवारी आग लागली. या आगीपासून काही अंतरावरच मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. पेट्रोलियम प्रकल्पाचा झालेला स्फोट आणि लागलेली आग यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही भीती इतक्या पराकोटीला गेली आहे की या भीतीने गावकर्‍यांनी आपली घरे सोडून मुंबईत राहणार्‍या नातलगांकडे आसरा घेतला असल्याची बाब पुढे आली आहे.

चेंबूरच्या माहुल परिसरात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, आरसीएफ, इंडियन ऑइल आणि टाटा पॉवर या पाच कंपन्यांचे रिफायनरी प्रकल्प आहेत. या प्रकल्पाच्या जवळच असलेल्या भूखंडावर मुंबईमधील तानसा पाईपलाईनवर असलेल्या झोपडीधारक आणि रस्त्याच्या विकासकामात आड येणार्‍या झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. या प्रकल्पग्रस्तांसाठी महापालिकेने एसआरएच्या माध्यमाने ७२ इमारती बांधल्या आहेत. या इमारतींमधील १० इमारती पोलीस आणि ५ इमारती पालिकेसाठी राखीव आहेत. इतर बहुतेक इमारतींमध्ये लोकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. उरलेल्या इमारतींमध्ये व बाजूच्या परिसरात अंदाजे ३० हजार लोक वास्तव्य करत असल्याची माहिती येथील स्थानिक रहिवाशी असलेल्या अविनाश मगर यांनी दिली.

- Advertisement -

बुधवारी रिफायनरी प्रकल्पांमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे पुनर्वसन केलेल्या इमारतींना मोठा हादरा बसला आहे. स्फोट झाल्यावर भूकंप आल्यासारखे घरांना हादरे बसत होते. यामुळे घरातील सामान हलत होते. स्फोटाने इमारतीमधील खिडक्या आणि दरवाज्याच्या काचा फुटल्या आहेत. स्फोटाच्या आवाजाने कानाचे पडदे फाटण्यासारखी स्थिती येथील रहिवाशांची झाली. स्फोट झाल्यावर रिफायनरीला आग लागली. रिफायनरी असल्याने आग कधीही पसरू शकते म्हणून आम्ही स्वतः घरे खाली करून इमारती खाली केल्या. काही रहिवाशांनी स्फोटाचा आवाज आणि आगीची दाहकता पाहून हा परिसर सोडून जाणे पसंद केले आहे. बुधवारी गेलेले रहिवाशी आजही परत आलेले नाहीत. यावरून रहिवाशांमध्ये किती दहशत पसरली असेल याचा महापालिकेने आणि सरकारने विचार करावा असे आवाहन अमरावती गुप्ता यांनी केले. मी स्वतः मुलाबाळांना घेऊन रात्र घराबाहेर काढली असे गुप्ता यांनी सांगितले.

आमचे मृतदेहसुद्धा मिळणार नाहीत

एखादी दुर्घटना घडल्यावर राजकीय पक्षांचे पुढारी आणि सरकारी अधिकारी त्या ठिकाणी धावून येतात. बुधवारी माहुलला भारत पेट्रोलिमच्या प्लांटमध्ये स्फोट होऊन आग लागली. या आगीपासून जवळच मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केलेल्या इमारती आहेत. या इमारतींमधील रहिवाशांची विचारपूस करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला यावे असे वाटलेले नाही. येथील रहिवाशांचा प्रदुषणामुळे आजारी पडून मृत्यू होत आहे. आता आगीमुळे आणखी भीती वाढली आहे. आमचा मृत्यू आगीमुळे झाला तर आमचा मृतदेहसुद्धा मिळणार नाही. –रेखा घाडगे,रहिवासी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -