घरमुंबईमोलकरणीनेच लुटले १४ लाख रुपये

मोलकरणीनेच लुटले १४ लाख रुपये

Subscribe

आपलं घर आपल्याशिवाय कोणाच्याच हातात सुरक्षित नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जुहू येथे एका घरात काम करणाऱ्या मोलकरणीनेच १४ लाख रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे. या चोरीप्रकरणी एका १९ वर्षांच्या मोलकरीणीला शुक्रवारी जुहू पोलिसांनी अटक केली. सोनाली अंकुश पेरवे असे या मोलकरीणीचे नाव असून अटकेनंतर तिला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

हिरेजडीत दागिने केले लंपास

मनोज प्रतापराय पारेख हे विलेपार्ले येथील दादाभाई क्रॉस रोडवरील जितेंद्र अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक ९०१ मध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचा वॉलपेपरचा मोठा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे गेल्या दिड वर्षांपासून सोनाली ही मोलकरीण म्हणून कामाला होती. १४ ऑक्टोंबर रोजी त्यांच्या भावाच्या मुलाचे लग्न होते, त्यासाठी त्यांच्या घरात लग्नाची तयारी सुरु होती. यावेळी मनोज पारेख यांनी त्यांच्या पत्नीला कपाटातील सर्व दागिने काढण्यास सांगितले होते, तिने कपाटातील लॉकरची तपासणी केली असता आतील सुमारे चौदा लाख रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने, कॅश असा ऐवज चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकाराने त्यांना धक्काच बसला होता. घरात बाहेरुन कोणीही आले नव्हते. त्यामुळे या चोरीमागे सोनाली पेरवे हिचा सहभाग असावा असा त्यांचा संशय होता. त्यामुळे त्यांनी तिच्याविरुद्ध जुहू पोलिसांत तक्रार केली होती.

- Advertisement -

वाचा – आधुनिक कचरापेट्या की जाहिरातीचा डिस्प्ले?

सोनालीवर संशय, तपास सुरू

तपासात सोनाली ही सप्टेंबर महिन्यांत तिच्या गावी निघून गेली होती. याच दरम्यान तिने ही चोरी केली असावी असा संशय त्यांनी व्यक्त केला होता. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच शुक्रवारी सोनालीला पोलिसांनी अटक केली. सध्या ती पोलीस कोठडीत असून तिची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. तिच्याकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केला जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -