घरमुंबईमेल-एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबईबाहेर

मेल-एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबईबाहेर

Subscribe

मेल-एक्सप्रेस रखडतात आणि त्यांच्या विलंबाचा फटका इतर लोकल फेऱ्यांना बसतो. एक्स्प्रेसला उशीर झाल्यामुळे लोकल देखील उशिरा धावतात. अशावेळी बऱ्याचदा लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागतात

पश्चिम रेल्वेवरील गर्दी पहाता प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत मेल-एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबईबाहेर ठेवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. मुंबई सेंट्रल विभागाने हा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव जर मंजूर झाला तर लोकलच्या फेऱ्या वाढतील, लोकल गाड्यांचा स्पीड वाढले त्याचसोबत पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मेल-एक्स्प्रेसमुळे लोकल सेवेवर परिणाम

पश्चिम रेल्वेवर सध्या गर्दीच्या वेळेत १७ मेल-एक्सप्रेस धावतात. सध्या उपनगरी वाहतुकीसाठी उपलब्ध असलेले मार्ग आणि त्यावरील वाहतुकीचा विचार करता गर्दीच्या काळात लोकल फेऱ्या वाढवण्यासाठी मेल-एक्स्प्रेसना मुंबईबाहेर थांबा द्यावा, अशी सूचना या प्रस्तावामध्ये देण्यात आली आहे. बऱ्याचदा मेल-एक्सप्रेस रखडतात आणि त्यांच्या विलंबाचा फटका इतर लोकल फेऱ्यांना बसतो. एक्स्प्रेसला उशीर झाल्यामुळे लोकल देखील उशिरा धावतात. अशावेळी बऱ्याचदा लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागतात आणि त्यामुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

‘गर्दीच्या वेळेत लोकलच्या फेºया वाढवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी पश्चिम रेल्वे मुख्यालयात पाठवण्यात आला आहे.’, संजय मिश्रा – पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक

- Advertisement -

फेऱ्या वाढविणे शक्य

या प्रस्तावाला मंजूरी मिळाली तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या फेऱ्या वाढलीत आणि प्रवाशांना दिलासा मिळेल. सध्या गर्दीच्या वेळेत दर ३-४ मिनिटांना एक लोकल चालवण्यात येते. सध्या पश्चिम रेल्वेवर १०० गाड्या असून त्यातील साधारण ९० नियमित वापरात आहेत. १ नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेच्या फेऱ्या वाढून त्या एक हजार ३६५ झाल्या. यात हार्बरच्या ११० फेऱ्यांचाही समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -