घरमुंबईमुसळधार पावसाने लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक बदललं!

मुसळधार पावसाने लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक बदललं!

Subscribe

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

गेल्या २ दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे नेहमीप्रमाणे मुंबई पुन्हा तुंबली. चाकरमान्यांना पुन्हा ऑफिसमध्ये किंवा नातेवाईकांकडे किंवा घरातच अडकून पडावं लागलं. पुन्हा मुंबईकरांचे हाल झाले. आणि पुन्हा एकदा अनेक तासांनंतर मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या हार्बर, सेंट्रल आणि वेस्टर्न लाईनवरची वाहतूक पुन्हा सुरू झाली. पण यासोबतच हाल झाले ते लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे. त्यातही ऐन गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचं तर सगळंच नियोजन कोलमडलं. ना ट्रेन चालू होत्या ना रस्ते वाहतूक सुरळीत होती. त्यातच, बुधवारी रोहा ते नागोठणे या स्थानकांदरम्यान दरड कोसळल्यामुळे आधीच खोळंबलेली कोकण रेल्वे मुंबईतल्या पावसामुळे अजूनच रखडली. या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून मुंबईतून बाहेर जाणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या नियोजित स्थानकाच्या आधीच थांबवण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – रात्रभर अडकलेल्या रेल्वे मुंबईकरांची घरवापसी!

रखडपट्टीनंतर सुरू झालेल्या ट्रेन

०१००७ – मुंबई ते सावंतवाडी – ५ सप्टेंबर सकाळी ४.३० वाजता
०१००८ – सावंतवाडी ते मुंबई – ५ सप्टेंबर

- Advertisement -

वेळापत्रक बदललेल्या ट्रेन

२२११९ – मुंबई ते मडगाव – ५ सप्टेंबर सकाळी ६ वाजता
१७४११ – मुंबई ते कोल्हापूर – ४ सप्टेंबरची ट्रेन ५ सप्टेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता
११००३ – दादर ते सावंतवाडी – ५ सप्टेंबर सकाळी ११.३० वाजता
५१०३४ – शिर्डी ते मुंबई – ३ सप्टेंबरला सुटणारी दौंडपर्यंतच धावेल
१२०५२ – मडगाव ते दादर – ४ सप्टेंबरला सुटणारी पनवेलपर्यंत धावेल
१७०५८ – सिकंदराबाद ते मुंबई – ४ सप्टेंबरला सुटणारी मनमाडपर्यंत धावेल
१२५४१ – गोरखपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस – ३ सप्टेंबरला सुटणारी चाळीसगावपर्यंत धावेल
१०११२ – मडगाव ते मुंबई – ४ सप्टेंबरला सुटणारी पनवेलपर्यंत धावेल
१२११६ – सोलापूर ते मुंबई – ४ सप्टेंबरला सुटणारी पुण्यापर्यंत धावेल
११०२० – भुवनेश्वर ते मुंबई – ३ सप्टेंबरला सुटणारी लोणावळ्यापर्यंत धावेल
१८०३० – शालिमार ते लोकमान्य टिळक टर्मिनस – ३ सप्टेंबरला सुटणारी इगतपुरीपर्यंत धावेल
१११४० – गदग ते मुंबई – ४ सप्टेंबरला सुटणारी दौंडपर्यंत धावेल
१५१०१ – छप्रा ते मुंबई – ३ सप्टेंबरला सुटणारी भुसावळपर्यंत धावेल

रद्द केलेल्या ट्रेन

१७४११ – मुंबई ते कोल्हापूर ५ सप्टेंबर

- Advertisement -

मार्ग बदललेल्या ट्रेन

५१०२९ – मुंबई ते बिजापूर – ५ सप्टेंबरला सुटणारी दौंडहून सुटेल
५१०३३ – मुंबई ते शिर्डी – ५ सप्टेंबरला सुटणारी दौंडहून सुटेल
१२०५१ – दादर ते मडगाव – ५ सप्टेंबरला सुटणारी पनवेलहून सुटेल
१७०५७ – मुंबई ते सिकंदराबाद – ५ सप्टेंबरला सुटणारी मनमाडहून सुटेल
१२५४२ – लो.टि.ट. ते गोरखपूर – ५ सप्टेंबरला सुटणारी चाळिसगावहून सुटेल
१०१०३ – मुंबई ते मडगाव – ५ सप्टेंबरला सुटणारी पनवेलहून सुटेल
११३०१ – मुंबई ते बंगळुरू – ५ सप्टेंबरला सुटणारी पुण्याहून सुटेल
१८०२९ – लो.टि.ट. ते शलिमार – ५ सप्टेंबरला सुटणारी इगतपुरीहून सुटेल
१११३९ – मुंबई ते गदग – ५ सप्टेंबरला सुटणारी दौंडहून सुटेल


हेही वाचा – आजही मुंबई, ठाणे, कोकणातील शाळा-कॉलेजना सुट्टी

दरम्यान, गेल्या २ दिवसांमध्ये मुंबईत २०० मिमी पाऊस पडल्यामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली आहे. आता तिन्ही मार्गांवर लोकलच्या फेऱ्या सुरु झाल्या असल्या, तरी या फेऱ्या उशिराने सुरू आहेत. तसेच, आज गुरुवारी देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्यामुळे पुन्हा मुंबईची तुंबई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आज देखील मुंबईकरांना मनस्ताप होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गरज असेल, तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -