घरमुंबईमरिन ड्राईव्हचा कायापालट होणार

मरिन ड्राईव्हचा कायापालट होणार

Subscribe

इको पार्क उभारणार

मुंबईच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवण्यात येणार्‍या मरिन ड्राईव्हचा लवकरच मेकओव्हर केला जाणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे हा कायापालट केला जाणार असून याठिकाणी लवकरच वॉटरफ्रंट उभारण्यात येणार आहे. या वॉटरफ्रंटच्या माध्यमातून येथील ३.५ किलोमीटरचा सागरी किनारा वाढवून आता ११ किलोमीटर इतका केला जाणार असल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे जाहीर केला जाणार आहे. लवकरच याचे कामकाज सुरु केले जाणार असून यासाठी आवश्यक ती सर्व त्या परवानग्या मिळालेल्या असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, सध्याच्या मरिन ड्राईव्हचा जो किनारा आहे, तो देखील या माध्यमातून बदलून त्याला नवा परदेशातील वॉटरफ्रंट प्रमाणे नवीन लुक दिला जाणार आहे.

मुंबईतील प्रसिद्ध सागरी किनार्‍यापैकी एक किनारा म्हणजे मरिन ड्राईव्ह. जवळपास ३.५ किलोमीटर परिसरात हा किनारा पसरला आहे. दररोज याठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. अशा या मुंबईच्या सागरी किनार्‍याचा कायापालट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून येथील नूतनीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व परवानगी मिळविल्या असून लवकरच त्यासंदर्भातील कामकाज सुरु केले जाणार असल्याचे कळते. ज्यात प्रामुख्याने इको पार्क सुरु केले जाणार असून त्यानुसार या भागांत हिरवळ वाढविली जाणार आहे. सध्या मरिन ड्राईव्हच्या किनार्‍यावर बसण्यासाठी मोठा कठडा असून त्यानंतर समुद्र किनारा सुरु होतो. मात्र लवकरच यात बदल केला जाणार असून परदेशात ज्या पध्दतीने वॉटरफ्रंटची संकल्पना राबविली जाते. त्याप्रमाणे या किनार्‍यावर ईस्टन वॉटरफ्रंट ही संकल्पना राबविली जाणार आहे. या योजनेनुसार येथील ३. ५ किलोमीटरचा भाग वाढवून जवळपास ११ किलोमीटरच्या घरात जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या वॉटरफ्रंटच्या निमित्ताने नागरिकांच्या सोयीसाठी अशा अनेक सुविधांची व्यवस्था याठिकाणी केली जाणार आहे. ज्यात प्रामुख्याने मोठे गार्डन, चिल्ड्रन्स प्लाझा, फुड कोर्टस यासारख्या योजना राबविल्या जाणार आहेत.

- Advertisement -

मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे राबविण्यात येणार्‍या या संकल्पनेनुसार ज्याठिकाणी ईको पार्कची उभारणी केली जाणार आहे. त्याठिकाणी संपूर्ण भाग हिरवळीचा भाग असणार आहे. याठिकाणी पर्यटनाला चालना मिळेल, असे हे पार्क असणार आहे. त्याचप्रमाणे ज्याठिकाणी वाहनांची येजा नसणार आहे, त्याठिकाणी वॉकिंग, सायकलिंग आणि इतर सोयी सुविधा देखील पर्यटकांसाठी दिल्या जाणार आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच याचे काम सुरु केले जाणार असून जगाला हेवा वाटेल, असा हा वॉटरफ्रँट असणार असल्याची माहिती त्यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -