मालाडच्या ‘बॉम्बे टॉकीज’ परिसरात भीषण आग!

Mumbai
Malad Fire News: Fire Broke out in Factory at Mumbai Malad
मालाडच्या बॉम्बे टॉकीज परिसरात भीषण आग (सौ.-ANI)

मुंबईच्या मालाड उपनगरातील बॉम्बे टॉकीज परिसरात काही वेळापूर्वी एका इमारतीला भीषण आग लागली. उपलब्ध माहितीनुसार अग्निशमनदलाच्या ११ गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. मालाडच्या सोमवारी बजार परिसरात ही आग लागली असून याठिकाणी निवासी तसंच कमर्शिअल इमारती आहेत. दरम्यान आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. समोर आलेल्या माहितीनुसार सोमवार बाजार परिसरातील एका लाकडी गोदामाल आग लागल्याचं समजत आहे. दरम्यान या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत, बॉम्बे टॉकीज परिसरातील वाहतूक स्थगित केल्याचं वृत्त समोर येत आहे. पाहा या घटनेचा व्हिडिओ :