घरमुंबईमालाड दुर्घटना : मृतांचा आकडा ३१ वर

मालाड दुर्घटना : मृतांचा आकडा ३१ वर

Subscribe

दोन आठवड्यांपूर्वी मुंबईच्या मालाड परिसरामध्ये जलाशयाची संरक्षक भिंत पडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा आता ३१ झाला आहे.

मालाड पिंपरीपाडा येथील जलाशयाची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या आणखी एका महिलेचा शनिवारी कुपर रुग्णालयात मृत्यू झाला आहे. बसंती किशोर शर्मा (५०) असे या महिलेचे नाव असून त्यांना शताब्दी रुग्णालयातून उपचारसाठी कुपर रुग्णालयात हलवले होते. परंतु शनिवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती कुपर रुग्णालयाचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. वाळके यांनी दिली आहे. त्यामुळे मालाड भिंत दुर्घटनाप्रकरणी मृतांचा आकडा ३१ वर पोहोचला आहे.

काय घडलं मालाडमध्ये?

३ जुलै रोजी मालाड पूर्वमधल्या पिंपरीपाडा परिसरामध्ये असलेल्या जलाशयाची संरक्षक भिंत मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळली होती. मध्यरात्री ही भिंत कोसळल्यामुळे तिच्या आडोशाला उभारण्यात आलेल्या झोपडपट्ट्यांचं यात मोठं नुकसान झालं. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झाली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ३० जणांना प्राण गमवावे लागले असून १००हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ७ बालकांचा देखील समावेश आहे.

- Advertisement -

जमीन खचून आणि दरड कोसळून झाली दुर्घटना

१ आणि २ जुलैच्या २४ तासांत ४६९ मिमी एवढा पाऊस पडला होता. रात्रीच्या वेळी कमी पाऊस पडल्याने त्या ठिकाणी जमीन खचून तसेच डोंगराळ भाग असल्याने जमिनीखाली मोठ्या प्रमाणात पोकळी निर्माण झाल्याने संरक्षक भिंतीचा भाग खचला. त्यामुळे ८० मीटर लांबीची आणि ३ मीटर उंचीची भिंत कोसळली. या भिंतींची छिद्रे, तसेच पर्जन्य जलवाहिनी या बर्‍याच ठिकाणी बुजवलेल्या आढळल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी अडथळा निर्माण झाला आणि पावसामुळे पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहून आलेल्या दगड, माती, गाळ आणि कचरा आदींमुळे छिद्र आणि पर्जन्य जलवाहिनींमधून पाण्याचा प्रवाह होऊ शकला नाही. परिणामी भिंत कोसळली असल्याचे म्हटले असल्याचे महापालिकेने आपल्या प्राथमिक अहवालात स्पष्ट केले आहे.

मालाडनंतर काही दिवसांतच डोंगरी!

दरम्यान, गेल्या मंगळवारी राजू बने या तरुणाचा मृत्यू झाला होता. तर, पाण्यात वाहून गेलेल्या सोनाली सपकाळचा मृतदेह वर्सोवा येथे आढळून आला. अद्यापही जखमींवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अभिजीत यांच्यावर अधिक उपचारांसाठी नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, अखेर मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. एकीकडे मालाड दुर्घटनेतील जखमींवर अजून उपचार सुरू असतानाच आता डोंगरी इमारत दुर्घटनेतल्या जखमीवर उपचार करण्याची वेळ मुंबईतल्या रुग्णालयांवर आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मालाड दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन माहुलमध्ये, पालिका देणार १०० सदनिका!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -