घरमुंबईमलेरिया, गॅस्ट्रोने डोके वर काढले

मलेरिया, गॅस्ट्रोने डोके वर काढले

Subscribe

कोरोनाबरोबर या वाढत्या साथीच्या आजारांचा पुन्हा एकदा पालिकेला सामना करावा लागणार आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने उपाययोजनांवर भर दिला आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आता मुंबई महापालिकेसमोर आणखी एक समस्या पुन्हा उभी राहिली आहे. मुंबईत मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टो हे साथीचे आजार वाढू लागले आहेत. नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत मलेरियाचे २४९, गॅस्ट्रोचे १२७ आणि लेप्टोचे २३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबरोबर या वाढत्या साथीच्या आजारांचा पुन्हा एकदा पालिकेला सामना करावा लागणार आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने उपाययोजनांवर भर दिला आहे.

पावसाळ्यादरम्यान वाढणारे साथीचे आजार व कोरोनाचा थैमान लक्षात घेत पालिकेच्या साथ नियंत्रण कक्षाने कंबर कसली होती. त्यामुळे पावसाळा व त्यानंतर उद्भवणारे साथीचे आजार आटोक्यात आणणे पालिकेला शक्य झाले. मात्र बदलत्या वातावरणामुळे पुन्हा एकदा साथीच्या आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. मलेरियाचे २४९, गॅस्ट्रो १२७, लेप्टो २३, डेंग्यू १७ रुग्ण आढळले आहेत. मात्र गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा फारच कमी आहे. कोरोनाचे संकट असताना साथीचे आजार रोखण्यासाठी, तसेच डास प्रतिबंध करण्यासाठी कीटकनाशक विभागाच्या माध्यमातून जंतूनाशक धूरफवारणी, डासांच्या अळ्यांची स्थाने नष्ट करण्याचे काम सुरू आहे. कोरोना सह इतर आजारांचे आक्रमण थोपवण्यासाठी आरोग्य विभागाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -